मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, ७ जून, २०२४

जगण्याचं सूत्र चुकतंय.....

 खूप मस्त लिहिलं आहे .


*जगण्याचं सूत्र चुकतंय का?* 



         भाऊ काय बहीण काय 


         नुसता फापट पसारा,  


         कोण कोणाला विचारतंय 


         कुणालाही विचारा ...



कुणी कोणाकडे जाईना


कुणी कुणाकडे येईना, 


जगलात काय मेलात काय 


माया कुणाला येईना ...



         संवेदनशीलता आता 


         फारशी कुठं दिसत नाही,  


         बैठकीत किंवा ओसरीवर 


         गप्पाची मैफिल बसत नाही ...



पॅकेज, इनक्रिमेंट, सॅलरी 


इन्व्हेस्टमेंट, विकएन्ड,  


यातच हल्ली माणसाचा 


होत आहे The End ...



         Luxury मधे लोळतांना 


         फाटकं गाव नको वाटतं,  


         जवळचं नातं असलं तरी 


         सांगायलाही नको वाटतं ...



उच्च शिक्षित असूनही 


माणूस आज Mad वाटतं,  


इंटेरियर केलेल्या घरामधे 


लुगडं, धोतर Odd वाटतं..  



         सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे


         कसे काय Posh असतील?  


         पार्लर मधून आणल्या सारखे 


         चिकणे चोपडे कसे दिसतील? 



उन्हा तान्हात तळणारी 


माणसं काळी पडणारच,  


गरिबीनं गांजल्यावर 


चेहऱ्याचा रंग उडणारच ...



         कुरूप ते नाहीत 


         कुरूप तू झालास,  


         प्रेम नात्यावर करायचं सोडून


         दिसण्याला भुलून गेलास ..  



..



         पात्र कितीही मोठं झालं 


         तरी गंगेचं मूळ विसरू नये,  


         सुख असो का दुःख असो 


         आपल्या माणसाला विसरू नये.  



दिसण्यावर प्रेम करू नकोस 


आपलं समजून जवळ घे,  


एरव्ही नाही आलास तरी 


दिवाळीला तरी घरी ये..  



      कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास 


      माणसावर प्रेम करायचं शिक,  


      नाहीतर मानसिक आरोग्यासाठी 


      दारोदार मागत फिरशील भीक ...



दुसऱ्याचा  छळ करून 


तुम्ही सुखी होणार नाही,  


पॅकेज कितीही मोठं असू द्या 


जगण्यात मजा येणार नाही. .  



       जग जवळ करतांना 


       आपली माणसं तोडू नका,  


       अमृताच्या घड्याला 


       अविचाराने लाथाडू नका..!



*मी का बोलू?*


*मी का फोन करू?*


*मी का कमीपणा घेऊ?*


*मी का नमते घेऊ?*


*मी का नेहमी समजून घ्यायचं?*


*मी काय कमी आहे का?"*



असे बरेच सारे *"मी"* आहेत ,


जे आयुष्यात विष कालवतात ...



म्हणून , अरे अतिशिकलेल्या माणसा *मी पणा* सोड नि 


नाती जोड़ .  🙏🏻🙏🏻🙏🏻 


धन्यवाद धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट