काचेची कांडी रेशमी वस्त्रावर पासली असता काचेच्या कांडीवर धन विद्युतप्रभार आणि रेशमी वस्त्रावर ऋण विद्युतप्रभार निर्माण होतात. हे प्रभार पदार्थांवर स्थिर राहतात. म्हणून स्थिर प्रभार म्हणतात.
- या स्थिर प्रभारांना बल लावून गती दिली तर प्रभारांचा प्रवाह निर्माण होईल. विद्युतप्रभारांच्या प्रवाहाला विद्युतप्रवाह म्हणतात.
कोरड्या विद्युतघटाला धन आणि ऋण टोके असतात. लहान तांब्याच्या तारांची टोके घन आणि ऋण टोकांना जोडून दुसरी टोके एका बल्बला जोडा. बल्ब प्रकाशीत होतो. कारण विद्युतघट तांब्याच्या तारांतील स्थिर ऋण प्रभारांना बल लावून गती देतो. हा विद्युतचा प्रवाह बल्बच्या फिलामेंट मधून गेल्याने ते तापून बल्ब प्रकाश देतो.
घटाने लावलेल्या बलाला विद्युतचल बल म्हणतात.
- ऋण प्रभारांना गतिमान करण्यासाठी लागणारे विद्युतचल बल विद्युतघटांच्या सहाय्याने मिळते. - साध्या विद्युतघटात विद्युतप्रवाह धन ध्रुवापासून (तांबे) ऋण ध्रुवाकडे (जस्त) वाहत जातो.
- विद्युतप्रवाह हवा तेव्हा सुरू किंवा बंद करता येतो. अशा घटास व्होल्टा घट म्हणतात. - साध्या विद्युतघटानंतर 1866 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ जॉर्ज लेकलँशे यांनी लेक्लॅशे घट बनवला.
- लेकलँशे विद्युतघटात मंगनिज डायऑक्साइड आणि कार्बन यांचे मिश्रण धन ध्रुव आणि जस्ताची कांडी ऋण ध्रुव असते.
अमोनिअम क्लोराइडच्या अल्कलीस धन आणि ऋण ध्रुव यांमध्ये ठेवतात. मँगनीज डायऑक्साइड आणि अमोनिअम क्लोराइडचा संयोग होऊन विद्युतप्रवाह मिळतो.
- कोरडा विद्युतघट आकाराने लहान असतो. त्याचा उपयोग विद्युत खेळणी, विजेरी, ट्रान्झिस्टर इत्यादींमध्ये वापरतात.
कोरड्या विद्युतघटाचे बाह्य आवरण जस्ताचे (Zn) असते, यास घटाचा ऋण ध्रुव म्हणतात. तसेच कार्बनची कांडी घटाचा धनष्ध्रुव असते. यात मैगनीज डायऑक्साइड (MnO₂) आणि ग्रॅफाइट यांचे मित्रश्रण तसेच झिंक क्लोराइड (ZnCl) आणि अमोनिअम क्लोराइड (NH,CI) यांच्या ओल्या मिश्रणाचा लगदा भरलेला असतो.
- कोरड्या घटाचे आयुष्य इतर घटांपेक्षा अधिक असते.
- ड्रिल मशीन, बगिच्यात वापरावी लागणारी यंत्रे इत्यादींमध्ये निकेल कॅडमिअम विद्युतघट वापरतात.
- निकेल कॅडमिअम घटात ऋणध्रुव कॅडमिअम असून धन ध्रुव निकेल असतो. दोघांच्या मध्ये पोटॅशिअम
हैड्रॉक्साइड (KOH) अल्कली असते.
- निकेल कॅडमिअम घट पुनः प्रभारित करता येतो.
- बटन सेल म्हणजे गुंडीच्या आकाराचा घट. घड्याळे, विद्युत खेळणी, कॅमेरा, कॅलक्युलेटर यांत बटन सेल वापरतात. बटन सेलला लिथिअम सेल असेही म्हणतात. लिथिअम सेल पुनः प्रभारित करता येत नाही. एखाद्या वाहकातून विद्युतप्रवाह वाहू लागताच तो चुंबकाप्रमाणे कार्य करतो. त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन सुईचे विचलन होते.
- चुंबकीय क्षेत्रात बदल झाला की, वेटोळ्यातून विद्युतप्रवाह वाहू लागतो. त्यास प्रवर्तित विद्युतप्रवाह म्हणतात. - चुंबकीय क्षेत्रातील बदल आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या विद्युतप्रवाहाच्या या क्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन असे म्हणतात.
- (1) चुंबकाची हालचाल होत असेपर्यंतच वेटोळ्यातून विद्युतप्रवाह वाहतो.
(2) चुंबकाच्या हालचालींच्या दिशेवर विद्युतप्रवाहाची दिशा अवलंबून असते; म्हणजे चुंबक जवळ येत असतानाची दिशा, चुंबक दूर जाताना निर्माण होणाऱ्या प्रवाहाच्या दिशेच्या उलट असते.
- चुंबक आणि वाहक यांतील परस्पर हालचालींमुळे विद्युत चुंबकीय प्रवर्तन होऊन वाहकातून विद्युत प्रवाह वाहू लागतो.
- मायकेल फॅरेडेने प्रथम विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा प्रयोग केला.
- एका नालाकृती चुंबकाच्या दोन ध्रुवांच्या मधोमध गोल फिरू शकेल असे वेष्टित तारेच वेटोळे टांगा. - वेटोळ्याच्या दोन टोकांत उत्तर आणि दक्षिण ध्रुव निर्माण झाल्यामुळे वेटोळ्याचे विचलन होते. जर वेटोळ्याचा उत्तर ध्रुव नालाकार चुंबकाच्या उत्तर ध्रुवासमोर असेल, तर प्रतिकर्षण होऊन टांगलेले वेटोळे विचलित होऊन गोल फिरेल. मोटारीतील आर्मेचर म्हणजे हेच वेटोळे होय. वेटोळ्यात दर अर्ध्या फेरीनंतर वेटोळ्यातून
म्हणजेच आर्मेचरमधून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहाची दिशा बदलावी लागते. दर अर्ध्या फेरीनंतर फिरणाऱ्या वेटोळ्याला प्रवाहाची दिशा बदलण्यासाठी कळ (कॉम्युटेटर) बसवलेली असते.
विद्युत चुंबकाचे चुंबकत्व त्यांतून प्रवाह वाहत असेपर्यंतच टिकते, म्हणून विद्युत चुंबक कायम स्वरूपी चुंबक नसते.
विद्युत चुंबकात त्यातून वाहणारा प्रवाह वाढवत नेल्यास त्यातील चुंबकत्व वाढत जाते. याच गुणधर्मांमुळे मोठमोठ्या वाऱ्यांमध्ये सामान हालवण्यासाठी विद्युत चुंबकांचाच वापर करतात. उदा. विद्युत घटांवर चालणारी खेळणी.
एखादे विद्युत उपकरण विद्युत घटाला जोडतात तेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो. त्यासाठी घटक -
(1) विद्युतघट
(2) विद्युत बल्ब विद्युत उपकरण
(3) वाहक तारा
(4) उघड-बंद होणारी कळ
- एकापेक्षा जास्त विद्युतघट जोडले, तर त्या जोडणीस बॅटरी म्हणतात.
- तांबे, लोखंड, अॅल्यूमिनिअम हे धातू उत्तम विद्युतवाहक आहेत.
रबर, लाकूड, कापड, प्लॅस्टिक हे विद्युतरोधक आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏