सर्व सजीव वनस्पती आणि प्राणी पेशींनी बनलेले आहेत.
इसवी सन 1665 मध्ये रॉबर्ट हूक या इंग्रज शास्त्रज्ञाने वनस्पती पेशीचा शोध लावला.
पेशींचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मर्दशकाचा उपयोग करतात, तसेच इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करण्यात येतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पदार्थ दोन अब्ज पट मोठा करून पाहता येतो.
पेशींची विशिष्ट रचना असते. पेशीमार्फत सजीवांच्या जीवनक्रिया घडून येतात.
पेशीमधील घटकांना अंगके असे म्हणतात.
पेशीमध्ये दहा अंगके असतात. 1. पेशी पटल 2. पेशीभित्तिका 3. पेशी रस 4. मायटोकॉंड्रिया 5. गॉल्जीबॉडीजपिंड
6. रायबोसोम्स 7. लायसोसोम्स 8. लवके 9. केंद्रक आणि 10. रिक्तिका,
पेशीच्या बाह्य आवरणास पेशीपटल म्हणतात. हे पातळ, लवचिक व पापुद्यासाखे असते.
पेशीपटल आतील भागांचे संरक्षण करते, नियंत्रण ठेवते व पेशीचा आकार निश्चित राहतो.
पेशीभित्तिका ही वनस्पतीमध्येच असते. पेशीपटलांचे बाह्य आवरण असते. सेल्युलोजची बनलेली असते
पेशीभित्तिका यामुळे पेशीस भक्कम आकार प्राप्त होतो.
केंद्रक हा मोठा व मध्यवर्ती व गोल घटक असतो. केंद्रकात डी एन ए पासून बनलेली गुणसूत्रे असतात. डी एनए चा ठरावीक लांबीचा धागा म्हणजे जनुक होय.
पेशीच्या सर्व कार्यावर केंद्रकाचे नियंत्रण असते. पेशी विभाजनात भाग घेते. पुढील पिढीत अनुवंशिक गुण
संक्रमित करते. पेशीतील द्रवरूप भाग म्हणजे पेशीरस किंवा पेशी द्रव अर्धप्रवाही पदार्थ आहे.
पेशीतील सर्व क्रिया अंगकांद्वारे घडवून आणल्या जातात.
मायटोकॉड्रिया लांबट गोल आकाराचे असतात. प्रत्येकास दुहेरी भित्तिका असते. आतील भित्तिकेस घड्या असतात.
मायटोकॉड्रिया ऊर्जा निर्माण करते, आणि ऊर्जेचा पुरवठा करते. ही ऊर्जाकेंद्रे आहेत.
गोल्जीपिंड म्हणजे पेशी रसातील चपटे पटल पिशव्या. यात विकर साठवतात.
रिक्तिका म्हणजे पोकळी, वनस्पती पेशीतील रिक्तिका मोठ्या व संख्येने जास्त असतात. यात उत्सर्जित पदार्थ व स्राव तात्पुरते साठवले जातात.
प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिकेचे आवरण नसते.
प्राणी पेशीमध्ये लहान रिक्तिका असून त्यांची संख्या कमी असते.
■प्राणी पेशीमध्ये हरितद्रव्य नसते.
सूक्ष्मजीव सर्वव्यापी आहेत म्हणजे ते हवेत, पाण्यात आणि मातीत असतात.
विषाणू, जिवाणू, शैवाल, कवके, किण्वपेशी, आदिजीव हे सूक्ष्मजीव आहेत.
काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात, तर काही उपद्रवी असतात.
- इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने विषाणू पाहता येतात. यात पेशीरस व अंगके नसतात. रचना साधी आहे.
- विषाणू भोवती प्रथिनांचे आवरण असते. प्रथिनामध्ये डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड (DNA) आणि रायचो न्यूक्लिक अॅसिड (RNA) असतात. DNA व RNA मुळे वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये रोग निर्माण होतात.
- जिवाणू हे विषाणूपेक्षा आकाराने मोठे आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच जिवाणू दिसतात. केंद्रकाभोवती गुणसूत्रे असतात. पेशीभित्तिका, पेशीपटल व पेशीरस अंगके असतात. काही जिवाणू उपकारक असतात, तर काही उपद्रवी म्हणजे रोगकारक असतात.
- - रायझोबिअम जिवाणू हवेतील नायट्रेजनचे, नायट्रोजनच्या संयुगात रूपांतरण घडवून आणतात. मातीतील अॅझेटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर घडवून आणतात.
- अॅझेंटोबॅक्टर जिवाणू सजीवांचे विघटन करून ह्यूमस तयार करून माती सुपीक करतात.
- स्टॅफिलोकोकस जिवाणू खाद्यपदार्थात एण्टेरोटॉक्सिन विषारी रसायन तयार करतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यावर जुलाब व उलट्या होतात.
हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांच्या वापराची मुदत संपल्यावर क्लोस्ट्रिडिअम विषाणू वाढतात.
शैवाल हे ओल्या दमट जागेत आढळते. पाण्यातील शैवालयात हरितद्रव्य असते. काही शैवालांचा उपयोग अन्न म्हणून होतो. डायटम शैवाल एकपेशीय आहे.
काही कवके उपकारक आहेत, तर काही उपद्रवकारक आहेत. उपद्रवकारक कवकांमुळे पदार्थांची नासाडी होते, त्वचेचे रोग होतात. ही परपोशी कवके कार्बनी पदार्थावर वाढतात.
इ.स. 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लोमिंगने पेनिसिलिन प्रति जैविकाचा शोध लावला. पेनिसिलिन हे प्रतिजैविक पेनिसिलिअम कवकापासून बनवले आहे. पेनिसिलिन प्रतिजैविकामुळे घटसर्प,न्यूमोनियाचे रोगजतूंचा नाश होतो.
क्लोरोमायसिटिन प्रतिजैविकामुळे विषमज्वरांच्या रोगजतूंचा नाश केला जातो.
स्ट्रेप्टोमायासिन प्रतिजैविकामुळे क्षय रोगजंतूचा नाश केला जातो.
टेट्रासायक्लिन प्रतिजैविक विविध रोग जंतूंचा नाश करते. तसेच एरिथ्रोमायसिन हे हौ प्रतिजैविक विविध
नाश करते.
रोगजंतूंचा नायकारक कवकवी पेशी आहेत. किम्वदेशी किण्वनाची क्रिया करतात. पाव, इडली, डोसा किण्वन प्रक्रियेने तयार होतात. ते रुचकर लागातात.
आदिजीव एकपेशीय प्राण्यांचा वर्ग आहे. पेशीत पेशीपटल व केंद्रक असतात, यात हरितद्रव्य नसते. काही आदिजीव उपद्रवी असतात. अमीबामुळे जुलाब, उलट्या असे पोटाचे विकार होतात. यावर वेळेवर उपचार करणे अत्यंत आवश्यक असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏