शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभांसाठी संबंधित कार्यालयात ये-जा करण्यासाठी, निवृत्तीवेतनाबाबतची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी, शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरीक म्हणून रेल्वे, बँका इ. विकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्यादृष्टीने त्यांना कायमस्वरुपी ओळखपत्र देण्याबाबत दिनांक २३ फेब्रुवारी, २०१७ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..
२. सबब सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी खालीलप्रमाणे नमूना विहित करण्यात येत आहे.
3. . तरी सर्व प्रशासकीय कार्यालये / विभाग यांना सूचित करण्यात येते की, सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना वरील नमुन्यात ओळखपत्रे देण्यात यावीत. ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी,
४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेताक २०१७०६२३१७५९४२६२०७ असा आहे. तसेच डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
Gr डाऊनलोड करा...
https://drive.google.com/file/d/1V3JsZQfdUn7M05GW8I6kZS3GOMFC_7TS/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏