प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत (शालेय पोषण आहार योजना) योजनेस पात्र शाळेतील इयता 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सर्व पात्र शाळांना धान्यादी वस्तूंचा
पुरवठा करण्यासाठी, सन 2024-25 करीता संचालनालयाकडून नियुक्त पुरवठादारामार्फत आवश्यक तांदूळ, भारतीयअन्न महामंडळाच्या गोदामातून उचल करुन शाळा स्तरापर्यंत वाहतूक करणे आणि आवश्यक असणाऱ्या धान्यादी
मालाचा पुरवठा करुन घेण्यास शासनाने मान्यता दिली असल्याचे, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडील परिपत्रक
जा.क्र. प्राशिस/पीएम-पोषण/01868 दिनांक 06/03/2023 अन्वये, निर्देश प्राप्त झाले आहेत. सन 2024-25 करीता पाककृती बाबत अदयाप निर्देश अप्राप्त असल्याने सन 2023-24 चे पाककृती नुसार कार्यवाही करणेसाठी संदर्भ क्रमांक ४ ने मान्यता घेण्यात आलेली आहे.
संदर्भ क्रं.2 अन्वये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत, सन 2024-25 करीता करारनामा व
कार्यादेश प्राप्त आहेत, त्यामध्ये धान्यादी माल व इतर घटकांचे दर बदललेले आहेत. त्यामुळे मु.का.अ. यांचे
मान्यतेने निश्चित पाककृतीमधील घटकांचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार माहे जुन 2024 व जुलै
2024 मधील 37 कार्यदिवसांकरीता शाळास्तरावर तयार आहार देणेस्तव पाककृतीचा तपशिल खालीलप्रमाणे.
परिपत्रक
Download करा...
https://drive.google.com/file/d/1QcLaY5f05n-EEiHFOiVwFqw6wcuZ-MKe/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏