विद्युत ऊर्जेचे प्रकाशीय ऊर्जेत रूपांतर विजेचा दिवा लावून करता येते.
- विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर ध्वनीक्षेपकामध्ये दिसून येते.
दूध, पाणी इत्यादी गरम करण्यासाठी उष्णता ऊर्जा लागते.
ऊर्जेची रूपे भिन्न भिन्न आहेत, तरी तिचे रूपांतर एका रूपातून दुसऱ्या रूपात करता येते.
ज्या पदार्थांच्या ज्वलनाने ऊर्जा निर्माण होते त्यांना इंधने म्हणतात.
खूप वर्षांपूर्वी प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जमिनीत गाडले गेले. त्यांचे इंधनामध्ये रूपांतर झाले. त्या
इंधनास जीवाश्म इंधन म्हणतात. लक्षावधी वर्षांच्या काळानंतर जीवाश्म इंधन निर्माण होते. म्हणून जीवाश्म
इंधनाचे साठे मर्यादित आहेत.
पृथ्वीच्या गर्भात स्थायू, द्रव आणि वायू अशा तीन अवस्थांत जीवाश्म इंधन सापडते. उदा. कोळसा (स्थायू), खनिज तेल (द्रव) आणि नैसर्गिक वायू (वायूरूपात)
कोळसा हा वनस्पतींच्या अवशेषापासून, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू हे समुद्रातील प्राणी आणि वनस्पती यांपासून तयार झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
जीवाश्म इंधानात हायड्रोकार्बनची संयुगे सापडतात, असतात. ज्यूल हे उष्णता ऊर्जेचे एकक आहे. एक किलोग्रॅम लाकडापासून सुमारे 1700 किलो ज्यूल एवढी उष्णता मिळते.
चारकोल म्हणजे लोणारी कोळसा किंवा लाकडी कोळसा होय, लाकडाच्या अपुऱ्या हवेतील ज्वलनापासून (विना धूर) चारकोल तयार होतो.
खनिजतेल हे पृथ्वीच्या पोटात अंदाजे 25000 मीटर खोलीवर सापडते. त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इंधन तेल मिळतात.
मुख्य स्रोतापाससून नैसर्गिक वायूचे स्थलांतर नळाद्वारे करणे आता सहज शक्य झाले आहे.
नैसर्गिक वायूचे प्रकार (1) मिथेन CH₁ (2) इथेन C₂H₄ (3) प्रोपेन C₂H₂ इ. आहेत. आपल्यासाठी सूर्य हा एकमेव ऊर्जास्रोत आहे. ही ऊर्जा प्राणी व वनस्पती शोषून घेतात. ती ऊर्जा रासायनिक
ऊर्जेच्या स्वरूपात साठवली जाते. त्यांच्या मृत्यूनंतर ती जीवाश्म इंधन स्वरूपात पुन्हा मिळते, असे हे ऊर्जाचक्र आहे.
पृथ्वीला दरवर्षी सुमारे 7×10¹² किलोवॅट एवढी सौरऊर्जा मिळते.
आपणाला आवश्यक असणारी ऊर्जा ही केवळ 40 मिनिटात सूर्य देतो.
सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा (सौर ऊर्जा) वापर सौरभट्टी, सौरतापक, अन्न शिजवणे, पाणी तापवणे किंवा गरम करणे यांसाठी करण्यात येत आहे.
सौरविद्युत घटात (सोलार सेल) सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करतात. उदाहरणार्थ सौरकंदील. कोळसा, तेल यांना पारंपरिक किंवा अनवीकरणीय ऊर्जास्रोत म्हणतात.
सौरऊर्जेला अपारंपरिक किंवा नवीकरण ऊर्जास्रोत म्हणतात. उदा. पवनऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, बायोगॅस, बायोडिझेल नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत,
पारंपरिक इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे.
वातावरणात सोडलेल्या वायूंमुळे आम्ल पर्जन्य (अॅसिड रेन) सारखे धोके वाढले आहेत.
वातावरणातील ओझोन थराला छिद्रे पडून त्यांतून हानिकारक किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू लागली आहेत. - शासनाने सौरऊर्जा, पवनऊर्जा, गोबर गॅस संयंत्रासाठी आर्थिक सवलत आणि तंत्रज्ञानाच्या सोई उपलब्ध
करून दिल्या आहेत. वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे ऊर्जा संकट भेडसावत आहे. त्यासाठी अपारंपरिक किंवा नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा
वापर करणे गरजेचे आहे.
युरेनिअमच्या अणूंवर न्यूट्रान्सचा मारा केल्यास त्यांतून अणुऊर्जा मिळते.
महाराष्ट्रात विद्युत उत्पादन तारापूरच्या अणुप्रकल्पातून सुरू झाले आहे.
सुरत जिल्ह्यात काकरापूर येथे अणुऊर्जा विद्युत प्रकल्प आहे.
इ.स. 2020 या सालापर्यंत भारत जगातली एक प्रमुख शक्ती म्हणून ओळखला जाईल.
नव्या तंत्रज्ञानावर आधारित सुधारित चुली, बर्नर्स, दिवे यांना शासन प्रोत्साहन देत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏