U-DISE+ सन २०२३-२४ Student Portal मधील विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्त करणेबाबत.
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, दि.१५/०५/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणालीमधील अहवालानुसार Student Portal मध्ये काही विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक अचूक नोंदविलेली नाही व काही विद्यार्थ्यांचे लिंग अचूक नोंदविलेले नाही. या दोन्ही बाबींची दुरुस्ती संबंधित शाळांकडून करुन घेणे आवश्यक आहे. तसेच Drop Box मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळांमध्ये नोंदविणे व विद्यार्थ्यांचे आधार Validation पूर्ण करणे महत्वाचे आहे. यासाठी U-DISE प्रणालीच्या Student Portal मध्ये माहिती अद्ययावत करण्याची सुविधा दि. १८/०५/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी केंद्र शासनाला विद्यार्थ्यांची माहिती अचूक उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏