NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत आयोजित योगा ऑलिम्पियाड स्पर्धेबाबत.
संदर्भ : जा.क्र.मा. संचालक, राशैसंप्रथम/कला क्रीडा/योगा ऑलिम्पियाड /२०२४-२५/ दि.१६.०५.२०२४ रोजीचे पत्र
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार NCERT, नवी दिल्ली यांचेकडील पत्रानुसार दि.२१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सन २०१६ पासून राष्ट्रीय योगा ऑलीम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तसेच सन २०२४-२५ मध्ये दि.१८ ते २० जून २०२४ या कालावधीत Regional Institute Of Education, म्हैसूर कर्नाटक येथे राष्ट्रीय योगा ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन आरोग्य, सुसंवाद आणि शांतता ही उद्दिष्टे डोळयासमोर ठेऊ न करण्यात येत आहे. सदर स्पर्धेचे आयोजन उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ६ वी ते ८ वी आणि माध्यमिक स्तर इयत्ता ९ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी केलेले आहे. त्यासाठी परिषदेकडून उच्च प्राथमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी तसेच माध्यमिक स्तरावरील ४ विद्यार्थी व ४ विद्यार्थिनी आणि साथीदार २ शिक्षक (त्यापैकी १ महिला शिक्षिका) यांचे नामांकन करावयाचे आहे. त्यासाठी आपल्या तालुक्यातील शाळांकडून विद्याथ्यांचे योगा प्रात्यक्षिकाचे व्हिडीओ आपल्या गुगल ड्राइव्हवर किंवा इतर सोशल मिडीयावर अपलोड करावेत. (सदर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर View For public करावे व त्याची लिंक व माहिती खालील दिलेल्या लिंकवर दि. २६.०५.२०२४ रोजीपर्यंत पाठवावी. https://forms.gle/7qUWCyMjWWn6wa2J9
खालील लिंक अधिक माहितीसाठी क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1Jz8VvqAApKTuNsDypeGih2aIYR1MFh2v/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏