*कितीही वेळा वाचली तरी परत परत वाचायला आवडेल अशी पोस्ट.....✍🏻*
*एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*
*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*
*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.*
*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*
*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....*
*वाघ जोरात झेप घेतो...*
*आणि तितक्यात वीज चमकते...*
*त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...*
*आणि*
*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...*
*माणसाचं आयुष्य हे असंच असतं...*
*त्याच्या हातात काहीच नसतं...*
*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...*
*कर्ता करविता असतो तो ईश्वर...*
*एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...*
*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...*
*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...*
*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*
*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...*
*कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...*
*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*
*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...*
*त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*
*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'*
*तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*
*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...*
*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*
*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?*
*कोण सांगेल? कोण सांगेल कोण??*
*कुणीच नाही...*
*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं...* *आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...*
*ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!*
*मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..*
*राजहंस मरताना सुद्धा गातो....*
*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...*
*आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*
*यालाच जीवन म्हणतात.*
*किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!*
*नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....*
*कोणाचा अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका.....*
*- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*
*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....*
*- कोणी कितीही महान झाला असेल,*
*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......*
*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......*
*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.....🌟*
*-स्वामी विवेकानंद*
Nice and real
उत्तर द्याहटवा