राज्य शासकीय महिला कर्मचारी तसेच पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी, जिल्हा परिषदेचे पत्नी नसलेले पुरुष वर्गीय शासकीय कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचान्यास तसेच वर नमूद केलेल्या विविध कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे, अशा कर्मचाऱ्यास देखील १८० दिवसांच्या कमाल मर्यादेत बाल संगोपन रजा पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूर करण्यास या शासन निर्णयाद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
0 मुलांचे वय १८ वर्षे होईपर्यंतच सदर रजा लागू राहील. (बाल संगोपन रजेवर असताना मुलाच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यास, त्या दिनांकापासून पुढे सदर रजा लागू होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी, रजा मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्याची राहील)
10 एका वर्षामध्ये २ महिन्यांच्या कमाल मर्यादेत सदर रजा घेता येईल.
सदर रजा ही उपरोक्त अट क्र.१ च्या अधिन राहून सेवा कालावधीत १/२/३/४ टप्प्यात (In Spelis) घेता येईल. तथापि, सदर रजा एका कॅलेंडर वर्षात तीन टप्प्यांमध्ये (In Three Spells) घेत्ता येईल.
iv) पहिल्या २ ज्येष्ठतम हयात मुलांकरिता लागू राहील.
शासकीय सेवेचे १ वर्ष पूर्ण झाल्यावर सदर रजा लागू राहील.
v अर्जित रजा व अर्थवेतनी रजा खात्यावर असली तरी सदर रजा मंजूर करता येईल.
vii) अर्जित रजा, अर्धवेतनी रजा तसेच प्रसूती रजेला जोडून ही रजा घेता येईल.
शासन निर्णय क्रमांका संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२५/सेवा-६
vii) एका कैलेंडर वर्षात घेतलेली रजा पुढील कॅलेंडर वर्षीही सलग असल्यास, ती ज्या कॅलेंडर वर्षात प्रारंभ झाला, त्या कॅलेंडर वर्षातील समजण्यात येईल.
ix) बालसंगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल.
x
परिवीक्षाधीन कालावधीत बालसंगोपन रजा मान्य करता येणार नाही. तथापि, रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास, कर्मचाऱ्याच्या मुलाबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे त्यास रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी खात्री झाल्यास, परिवीक्षाधीन कालावधीतही संबंधितास अपवादात्मक परिस्थितीत, कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा मंजूर करता येईल. त्या प्रमाणात संबंधित महिला/पुरुष कर्मचाऱ्याचा परिवीक्षाधीन कालावधी वाढविला जाईल.
सदर रजा कालावधीत रजा प्रवास सवलत (LTC) अनुज्ञेय ठरणार नाही.
xi
सदर रजा हक्क म्हणून मागता येणार नाही, सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व मान्यतेनेच
येईल. बालसंगोपन रजा मंजूर करताना पदनिर्मिती तसेच पदभरती होणार नाही ६
कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन रजा मंजूर करण्याची सक्षम अधिकाऱ्याची राहील. संबंधित कर्मचान्याची वारंवार रजा घेण्याची प्रवृत्ती नाही, ही बाब
देखील सदर रजा मंजूर कराना विचारात घ्यावी.
बालसंगोपन रजा...शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇
https://drive.google.com/file/d/1X7eWafWxO6H8mHWppsyazEkQG9OUWubz/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏