शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी लेखन, टंकलेखन व मुद्रण करण्यासाठी स्वीकारलेली देवनागरी लिपी आणि वर्णमाला याबाबतचे शासन निर्णय वर नमूद केल्याप्रमाणे प्रसृत करण्यात आले होते. या शासन निर्णयानुसार स्वीकारलेली वर्णमाला व जोडाक्षर पध्दती ही मराठी देवनागरी लिपीच्या परंपरेशी व संकेतांशी सुसंगत नव्हती. त्यामुळे मराठी लेखनात गोंधळ निर्माण झाला आहे. मराठी भाषेच्या लिपीच्या व लेखनाच्या संदर्भात वर्तमानपत्रांमधूनही याविषयी वेळोवेळी मतमतांतरे, लेख, पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छावल्या जाणा-या जोडाक्षरांबाबतही सातत्याने चर्चा होत असते. मराठी भाषेच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्थानी, तसेच काही भाषातज्ञांनी देवनागरी लिपी व वर्णमालेतील त्रुटी तसेच लेखनमुद्रणात एकरुपता नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिलेले असून मराठी भाषेसंदर्भात लिपी, वर्णमाला, जोडाक्षरलेखन इत्यादी मूलभूत बाबीवर पुनर्विचार करणे आवश्यक झाले होते.
सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर झपाट्याने होत आहे, तसेच यापुढेही अधिकाधिक प्रमाणात होत राहणार आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये संगणकाचा वापर सुरू केलेला असून, शासन व्यवहाराची भाषा मराठी असल्यामुळे संगणकावरही मराठी भाषेतून शासनाचे कामकाज पार पाडणे आवश्यक आहे. मराठी भाषेतून संगणकावर काम करण्यासाठी सध्या अनेक आज्ञावल्या (सॉफ्टवेअर्स) उपलब्ध आहेत. तथापि, त्या सॉफ्टवेअर्समध्ये एकरुपता नाही इंग्रजी फलकावर केलेली मराठी अक्षरजुळणी प्रत्येक
आज्ञावल्यामध्ये (सॉफ्टवेअर्समध्ये) वेगळी असते. एका सॉफ्टवेअरमधील फाईल दुस-या सॉफ्टवेअरमध्ये उघडत नाही प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे कळफलक आत्मसात करणे किंवा सॉफ्टवेअर विकत घेऊन संग्रही ठेवणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे 'वेगाने व विविधांगी काम होणे' हे जे संगणकाचे वैशिष्ट्य आहे, तेच मराठीच्या बाबतीत निष्फळ ठर म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा संगणकावरील उपयोग वाढविण्यासाठी सर्व 2/18 सॉफ्टवेअर्सच्या कळफलकामध्ये एकरुपता आणणे, त्यांचे प्रमाणीकरण करणे, थोडक्यात प्रमाणीकृत मराठी आज्ञावली (सॉफ्टवेअर) तयार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठी वर्णमालेचे व वर्णक्रमाचे प्रमाणीकरण करणे आवश्यक होते.
भारतातील विविध भाषिक राज्यांना माहिती तंत्रज्ञानाचा फायदा मिळावा, देशात त्याचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून केन्द्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने "लैंग्वेज टेक्नॉलॉजी व्हिजन' हा कार्यक्रम आखलेला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून होण्यासाठी शासनाने काळाची पायले ओळखून संगणक तंत्रज्ञानाचा मराठी भाषा व संस्कृती इत्यादीच्या विकासासाठी प्रथम मराठी भाषेची लिपी, वर्णमाला, वर्णक्रम इत्यादींचे प्रमाणीकरण करणे गरजेचे होते.
या सर्व बाबी विचारात घेऊन मराठी भाषेच्या विकासासंदर्भात कार्यरत असणा-या विविध सेवाभावी संस्थांनी, नामवंत भाषा तज्ञ, तसेच संगणक तज्ञ यांचेसमवेत चर्चा व सखोल विचार विनिमय करून त्यासंबंधीचा अहवाल शासनास सादर केला होता. मराठी भाषेच्या विकासासाठी विविध सेवाभावी संस्थांनी सादर केलेल्या अहवालानुसार मराठी भाषेची लिपी, वर्णमाला, वर्णक्रम इत्यादी सुधारीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय
सर्व शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्त इत्यादींमध्ये तसेच ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होत. अथवा भविष्यात केला जाणार आहे अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला आहे. त्या अनुषंगाने वर्णमालेच्या संदर्भातील स्पष्टीकरणे तसेच विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना, स्वरचिन्हे,
जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अक, अंकांचे अक्षरी लेखन
इत्यादीविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना देणारी सात परिशिष्टे सोबत जोडली आहेत. मराठी
भाषेच्या लेखनात एकरुपता राखण्यासाठी सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
Download link
https://drive.google.com/file/d/1MzlOK__hrNs3T--L5vksRNBG6c3Mkecp/view?usp=drivesdk
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏