*"प्रत्येक समाजामध्ये LEADERSHIP दोन प्रकारच्या असतात....!!"*
*१) Image Base Leadership*
&
*२) Knowledge Base Leadership*
*1) Image base leadership* ही आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते. अशा leadership कडे मनीपाॅवर व मसलपाॅवर असते, गाडी असते, बंगला असतो आणि चमच्यांचा लवाजमा असतो. असे leader डोळ्यावर गॉगल लावतात आणि पांढ-या शुभ्र गाडीतून फिरतात. त्यांच्यामागे त्यांचे चमचे, दलाल
हुजरेगिरी करतात. अशी leadership समाजात पैशाच्या जोरावर image तयार करतात. परंतू ही Image केवळ एका कुरकुरेच्या पाकीटासारखी असते, ज्यात 90% हवा असते. अशा लिडरशीप पासून समाजाचे कधीही पोट भरत नाही. ते समाजाला कोणतेच हक्क, अधिकार मिळवून देऊ शकत नाही. कारण त्यांचा विश्वास चमकधमकवर जास्त असल्याने दुस-यांसाठी लढत नाही..! मात्र अशा लिडरांच्या मागेच समाजातील 90% लोक *हुजुरेगीरी* करतांना दिसतील. त्यांना इतका मानसन्मान देतील कि जणूकाही त्यांच्यामुळेच आपण जगत आहोत. वास्तविक आपल्या सर्वांना अशा leadership ची खरी औकात माहिती असते पण तरीही लोक असत्यालाच का स्विकारतात..? हा संशोधनाचा विषय आहे. अशा leadership पासून समाजाने सावध राहिले पाहिजे. जो समाज अशा leadership पासून सावध राहतो व अशांना महत्व देत नाही तोच समाज ख-या अर्थाने प्रगती करीत असतो....!
*2) Knowledge Base Leadership* ही कुठलाही दिखावा करत नाही. समाजात मान-सन्मान मिळावा म्हणून काम करत नाही. त्यांचं उद्दिष्ट केवळ आणि केवळ *आपल्या समाजाच्या हितासाठी कार्यरत राहणे, त्यांच्या हक्काप्रती जागरुक राहून त्यांना समाजातील घटकाला न्याय मिळवून देणे, समाजात प्रबोधनात्मक चळवळ निर्माण करणे* असे असते. अशी लिडरशीप आपनास लाखात एक व्यक्ति पाहण्यास मिळते. पण अशा लीडरशिपला समाजातील अनेक लोकांचा विरोध सहन करावा लागतो. समाज अशा लोकांना पदोपदी अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रयत्न करतो. *भंपक leadership* ची चमचेगीरी करणारे अशा लिडरांची बदनामी करण्यात पुढेच असतात. मात्र ही लीडरशिप तावुन सुलाखूंन निघते. जरी या लीडर शिपला आयुष्यात यश नाही मिळाले तरी ते लोकांच्या मनावर शेकडो वर्ष राज्य करतात. जगात आतापर्यंत जे जे सकारात्मक घडले आहे, ते *Knowledge Base Leadership* नेच घडविले आहे. समाजातील मोठ्या परिवर्तनाचा पाया ते रचत असतात. म्हणून समाजातील सर्व प्रकारच्या लोकांनी या दोन लिडरशीप मधील फरक ओळखून आपला लिडर कोण हे ठरवावे...!
सध्या लोकांची स्वत:ची आकलन व निरिक्षण क्षमता खुपच अत्यल्प होत चालली आहे, योग्य काय आणि अयोग्य काय..? याची पडताळणी करायची दृष्टीही दुर्मिळ होत आहे.
मात्र जो समाज *Knowledge Base Leadership* ला ओळखून त्याच्यासोबत चालतो, तोच समाज प्रगतीपथावर आहे, जो समाज आजही दिशाहिन व अनंत समस्यांमध्ये ग्रस्त आहे, याचा अर्थ *Image Base Leadership* चा समाजामध्ये बोलबाला आहे.
*म्हणून सावध व्हा.....!* आणि ख-या लिडर्सना ओळखा.. अन्यथा...
*_"काळ कोणालाही माफ करत नाही.....!"_*
*Knowledge Base Leadership करणा-याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, बळ द्या....!*✍✍✍l
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏