blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

माझी यशोगाथा तंत्रज्ञानातून शिक्षण

 
























यशोगाथा

मी विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर येथे 16 .9.2019 पासून कार्यरत आहे. मी एक उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक असून बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्यावर माझा अधिक भर होता. मी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कृतीद्वारे अध्यापन करत असताना त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्या आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट एखादी संकल्पना सहज समजते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

विद्यार्थ्यांना शाळेमध्ये कम्प्युटर उपलब्ध असून आठवड्यातून दोन ते तीन वेळा मी विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर हाताळण्यास व नवीन गोष्टी शिकण्यास संधी देत असतो विद्यार्थ्यांना वर्ड मध्ये नावे टाईप करणे स्वतःचा फोल्डर बनवणे भौमितिक आकार काढणे व रंगवणे युट्युब च्या आधारे विविध प्रकारचे व्हिडिओ सर्च करून पाहणे तसेच गुगलच्या आधारे आपल्याला हवी असणारी माहिती विद्यार्थी सहज सर्च करू शकतात.

त्याचप्रमाणे गुगल फॉर्मच्या आधारे तयार केलेल्या स्पर्धा परीक्षा टेस्ट स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट विद्यार्थी सातत्याने सोडवत आहे त्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडली आहे.

मी महाराष्ट्रातील व देशातील इतर शिक्षकांच्या शैक्षणिक वेबसाईट पाहिल्या आणि ब्लॉगचा/ वेबसाईटचा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होतो याची मला जाणीव झाली म्हणून स्वतःची एक वेबसाईट असावी आणि त्याचा आपल्या शाळेतील व इतर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग व्हावा, त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या युगात आपणही बदलावे यासाठी मला शैक्षणिक वेबसाईट अथवा ब्लॉग निर्मिती करावी वाटली.

मी www.vkbeducation.com


एक शैक्षणिक वेबसाईट तयार केले असून त्यावरती लहान मुलांच्या स्पर्धा परीक्षा टेस्ट, सामान्य ज्ञान च्या टेस्ट, स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट, बोधकथा जनरल नॉलेज, दिनविशेष, महान व्यक्ती वी माहिती, महान व्यक्तींची जयंती अथवा पुण्यतिथी महत्त्वाचे दिवस यावरती विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे जीआर , परिपत्रके अशा विविध प्रकारची माहिती उपलब्ध आहे. प्रमाणे लहान तसेच मोठ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारे प्रेरणादायी लेख, जीवन उपयोगी माहिती सुद्धा वेबसाईटवर उपलब्ध आहेत. थोर महापुरुषांच्या किंवा विशेष दिवसांच्या प्रश्नमंजुषा टेस्ट सोडल्यावर विद्यार्थ्यांना ईमेल वरती सहभाग प्रमाणपत्र प्राप्त होते त्यामुळे विद्यार्थी अधिकाधिक टेस्ट सोडवतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडते.


आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःची एक शैक्षणिक वेबसाईट तयार करून विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी त्याचा उपयोग होतोय ही गोष्ट खूप मला आनंद देणारे आहे. शैक्षणिक वेबसाईट अथवा ब्लॉग निर्मिती करण्यासाठी मी नेहमीच इतर शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहे . 

विजयकुमार किसन भुजबळ

 उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

केंद्र कोरेगाव

तालुका कोरेगाव जिल्हा सातारा

मोबाईल 9421177738

1 टिप्पणी:

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट