*अशोक कामटे*
(अतिरिक्त पोलीस कमीश्नर, मुंबई)
*जन्म: २३ फेब्रुवारी १९६५*
(चांबळी, महाराष्ट्र)
*मृत्यू : २७ नोव्हेंबर २००८*
(चौपाटी , मुंबई)
पुरस्कार : अशोक चक्र(२००९)
धर्म : हिंदू
वडील : मारुतीराव
मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कमिशनर पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती . त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1965 रोजी झाला . ते एक कर्तव्य कठोर पोलीस अधिकारी होते आणि त्यांना मुंबईचे रक्षण करताना वीरगती मिळाली . पण फार थोड्या लोकांना माहिती आहे की ते उत्कृष्ट पैलवानही होते . जेथे मुरारबाजीसारखा वाघ छत्रपती शिवरायांना पुरंदरावर मिळाला त्या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या चांबळी गावचे हे सुपुत्र.
या गावात कुस्तीची परंपरा आहे. कामटे याचे वडील कर्नत होते व ते कुस्तीच्या खेळातूनच लष्करात भरती झाले होते. तर आजोबा पोलीस अधिकारी होते . अशोक कामटे यानी अनेक नामाकित पैलवानांना अस्मान दाखविले होते . कोडाईकनातव्या इंटरनेशनल स्कूलमधून कामटे याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले , तर पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात झाते . त्याना आतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती , मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातून त्यानी पदवी प्राप्त केली , तर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयात एमए पूर्ण केले . त्याना कॅम्प रायझिंग सन मधून आतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते 1992 मध्ये उत्तीर्ण झाले . पेरू येथे झालेल्या ज्युनिअर पॉवर लिफ्टींग स्पर्धेत 1978 मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते .
अशोक कामटे हे पोलीस दलामध्ये बॉडी बिल्डर म्हणून प्रसिद्ध होते . त्यांनी बंधकांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेतले होते . मुंबई हल्ल्याच्या वेळी ते मुंबईच्या पूर्व विभागात ड्युटीवर होते . त्यामुळे त्यांना कामा हॉस्पिटल कारवाईसाठी इमारतींमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. कामटे हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते . त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून भंडारा , सातारा , ठाणे ग्रामीण येथे काम केले . वर्ष 1999 ते 2000 या कालावधीत युएनमिशन बोस्निया येथे प्रतिनियुक्तीवर होते . वर्ष 2000 मधे डेपुटी कमिशनर पोलीस मुंबई म्हणून नेमणूक झाली . त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर येथे जिल्हा पोलीस प्रमुख पदावर नेमणूक झाली . त्यांनी वर्ष 2008 मधे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यभार स्वीकारला आणि पाचच महिन्यात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले .
त्यांच्या पत्नी विनिता कामटे ( सहलेखिका विनिता देशमुख ) यांनी " टु द लास्ट बुलेट ' या पुस्तकात त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत , अखेरचा प्रवास या प्रकरणात अशोक कामटे यांच्या अंतिम यात्रेचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन केले आहे . विनीता कामटे लिहितात - माझे सासरे तर दुःखाने पूर्ण कोलमडले होते . पण तेही एक लष्करी अधिकारी होते अखेरच्या क्षणी त्यांच्या मनातला सैनिक जागा झाला आणि अखेरची मानवंदना चालू असताना त्यांनीही खाडकन सॅल्यूट ठोकत वीरमरण प्राप्त केलेल्या आपल्या पुत्राला अखेरची सलामी दिली . तो जसा जगला तसच त्याला बघणं मला आवडेल . अशा कर्तव्य दक्ष अशोकास 2009 मध्ये त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏