एक ओढा होता, त्याचे पाणी नितळ स्वच्छ होते. तो जोरात बाहन होता. तो आओस ओलांडून जाण्यासाठी त्या ओढ्यावर एक ऑडका होता.
एक पांढरी शेळी आली, तो ओडक्यावरून जाऊ लागली. समोरून एक काळी शेळी येत होती. दोघी समोरासमोर आल्या.
पांढरी शेळी काळ्या शेळीला म्हणाली, "ए काळे, बाजूला हो. मी आधी जाणार पांढऱ्या शेळीने "काळी" म्हटल्याबरोबर काळी शेळी भडकली. म्हणाली, "ए पांढरे, कोणाला काळी म्हणतोस. मी तुझ्यासारखी पांढऱ्या पायाची नाही. तूच बाजूला हो. मी आधी जाणार. मला घाई आहे."
काळ्या-पांढऱ्या रंगावरून दोघीत भांडण जुंपले. दोघींची टक्कर सुरू झाली.
पण ओंडका फारच लहान आहे, हे दोघींच्या लवकरच लक्षात आले. असेच भांडत राहिले, तर या अरुंद ओंडक्यावरून पाण्यात पडू आणि दोघीही पाण्यात बुडून मरून जाऊ.
म्हणून काळी शेळी म्हणाली, "ताई, मी खाली बसते. तू माझ्या पाठीवरून पुढे जा. मग मी जाईन."
पांढरी शेळी म्हणाली, "बरोबर आहे. तसेच करू या." काळी शेळी खाली बसली. तिच्या पाठीवरून पांढरी शेळी पलीकडे गेली. मग काळी शेळी उठली.
आणि दोघींनी सुखरूपपणे ओढा ओलांडला.
समजूतदारपणामुळे दोघींनी एकमेकींना मदत केली. म्हणून दोघीही वाचल्या.
तात्पर्य - समजूतदारपणे एकमेकांना मदत करावी. वादविवाद टाळावेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏