*_SWIFT CHAT ऍप मध्ये PAT परीक्षेचे गुण कसे भरावे?_*
*swift chat अँप वर PAT परीक्षेचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे*
*📱 SWIFT CHAT ऍप वर PAT (महाराष्ट्र) हा पर्याय कसा उपलब्ध होईल?*
*उत्तर -:*
*1️⃣ SWIFT CHAT हे अँप ओपन करा*
*2️⃣ Bot Store वर जा(मोबाईल स्क्रीन च्या खालील बाजूस उजव्या बाजूला आहे) व त्यावर क्लिक करा*
*3️⃣ आता तुमच्या मोबाईल इंटरफेस च्या वरच्या बाजूस Bot Store चा सर्च बार आहे. तेथे जाऊन "PAT" हे नाव टाईप करा*
*किंवा खालील लिंक ला क्लिक करा*
*4️⃣ आता तुम्हाला "PAT(महाराष्ट्र) असे नाव - अँप दिसेल. त्यावर क्लीक करा*
*5️⃣ आता PAT(महाराष्ट्र) ऍप व तुमचे चॅटिंग सुरू होईल.....*
*'HI' असा मेसेज पाठवा*
*6️⃣ आता तुमची भाषा निवडा*
*7️⃣ आता तुमच्या शाळेचा युडायस नंबर टाका.ताबडतोब PAT तुमच्या शाळेचा कोड, नाव,प्रभाग,जिल्हा.पाठवून देईल.ते बरोबर आहे का ते चेक करा व "हो बरोबर आहे" या पर्यायावर क्लीक करा*
*8️⃣ आता तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा. लगेच तुम्हाला PAT तुमचा शिक्षक कोड, नाव , पद पाठवून देईल. ते योग्य आहे का ते चेक करा. "हो बरोबर आहे" हा पर्याय निवडा*
*9️⃣ "आता विद्यार्थ्यांच्या कामगिरी ची नोंद ठेवा" हा पर्याय निवडा*
*🔟 आता तुमची इयत्ता निवडा*
*1️⃣1️⃣ आता तुमचा विषय निवडा*
*1️⃣2️⃣ आता एकेक विद्यार्थी निवडा व तो उपस्थित की अनुपस्थित ते क्लिक करा.*
*1️⃣3️⃣ तुम्ही उपस्थित असे क्लिक केले की लगेच तुमच्यासमोर त्या त्या विषयाचा एकेक प्रश्न येईल.त्या प्रश्नात त्याला किती मार्क मिळाले याची आपल्याला नोंद करायची आहे*
*1) तो प्रश्न त्या विद्यार्थ्याने सोडवला नसेल तर (not attempted) वर क्लीक करा*
*2) 0 गुण मिळाला असेल तर "0" या पर्यायावर क्लीक करा*
*3) 1 गुण मिळाला असेल तर "1" या पर्यायावर क्लिक करा*
*4) 4 गुण मिळाले असतील तर "4" या पर्यायावर क्लिक करा*
*योग्य तो पर्याय निवडल्यावर पुढचा प्रश्न येईल. त्याचे गुण पुढीलप्रमाणे नोंद करा*
*पण एकदा का उत्तर सबमिट केल्यावर तुम्ही तुमचा पर्याय/प्रतिसाद बदलू शकत नाही*
*1️⃣4️⃣ PAT(महाराष्ट्र) च्या अँप मध्ये तुम्ही जेथे एडिट करता म्हणजे मेसेज लिहिता त्याच्या डाव्या बाजूला चार चौकोन असलेले चिन्ह दिले आहे. त्यावर क्लिक करून....*
*1) Home Menu*
*2) Edit Registration*
*3) Change Medium*
*या पर्यायावर जाऊ शकता पण त्यापूर्वी तुम्ही तुमची माहिती सेव्ह केलेली असणे गरजेचे आहे. नाहीतर ती सेव्ह होणार नाही*
*1️⃣5️⃣ Home Menu वर जाऊन पुन्हा पुढची इयत्ता, विषय निवडू शकता*
🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏