*🏆राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४🏆*
*✒️राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.*
१.पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)
२.प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
३.माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता )
*✒️प्रस्तुत स्पर्धा ही मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे.*
*✒️या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जाऊन माहिती पत्रकाचे अवलोकन करावे.*
*✒️ सर्व माध्यमातील स्पर्धकांनी आपले नवोपक्रम अहवाल मराठी अथवा इंग्रजी या भाषेमध्येच https://scertmaha.ac.in/innovation/
या लिंकवर दि.२८/११/२०२३ अत रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत.*
*✒️या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा
🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏