*_बोधकथा_*
💫💫💫💫
एकदा एक मुलगा आपल्या शाळेची फी भरण्यासाठी दारोदार फिरून काही सामान विकायचा. एका दिवशी त्याचे काहीच सामान विकले गेले नाहीं आणि त्याला खूप भूक लागली होती. त्याने विचार केला की आता ज्या दरवाजावर सामान विकायला जाऊ तेथे काहीतरी खायला मागायचे.
पहिला दरवाजा वाजवला. तो एका मुलीने उघडला. तिला पाहताच तो घाबरला आणि काही खायला मागायच्या ऐवजी त्याने तिच्याकडे पिण्यासाठी एक ग्लास पाणी मागितले.
त्यांच्या आवाजावरुन त्या मुलीने ओळखले की याला भूक लागली आहे. म्हणून ती त्याच्यासाठी एका ग्लासात पाणी आणि एक मोठा ग्लासभरुन दूध घेऊन आली.
मुलाने भूक लागली असल्याने ते ग्लासभर दूध घटाघटा पिऊन टाकले.
" किती पैसे देवू ?" त्या मुलाने तिला विचारले .
" पैसे कसले ?"त्या मुलीने विचारले. "आईने मला शिकवलेय की जेव्हा ही कोणावर दया केलीस तर त्याचे पैसे घेवून नकोस."
" मग तर मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो."
"जेव्हा त्या मुलाने तिचे घर सोडले त्याला ना केवळ शारीरिक दृष्ट्या शक्ती प्राप्त झाली होती आणि त्याचा देवावरचा आणि माणसावरचा विश्वास अजून वाढला.
काही वर्षे उलटली. ती मुलगी गंभीर स्वरूपी आजारी पडली. लोकल डॉक्टरांनी तिला शहरातील मोठ्या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.
निष्णात डॉक्टर होवार्ड केल्लींना रोग्याच्या तपासणीसाठी बोलावले गेले. जसे त्यांनी त्या मुलीच्या वस्तीचे नांव ऐकले त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. एकदम आपल्या खुर्चीतून उठून ते त्या मुलीला दाखल करुन घेतलेल्या कक्षात गेले.
त्यांनी त्या मुलीला पाहिले आणि पाहताच ओळखले आणि त्यांनी ठरवले की या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी आकाशपाताळ एक करीन. त्यांची मेहनत आणि तिला वाचवण्यासाठीची आस यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
डॉक्टरांनी इस्पिटळाच्या ऑफिसमधे जाऊन त्या मुलीच्या आजाराचे बिल चुकते केले आणि बिलाच्या कोपऱ्यात एक वाक्य लिहिले आणि ते बिल त्या मुलीकडे पाठवून दिले.
ती मुलगी बिलाचा लिफाफा पाहून घाबरून गेली. तिला माहित होते की ती आजारातून तर वाचली पण बिलाची रक्कम तर आता तिचा जीव घेईल.
आणि तिने हळूच तो लिफाफा उघडला, रक्कम पाहिली आणि अचानक तिची नजर बिलाच्या कोपऱ्यात पेनाने लिहिलेल्या वाक्यावर गेली.
ज्यावर लिहिले होते, "एक ग्लास दूधाने हे बिल भरले गेले आहे." खाली त्या डॉक्टर होवार्ड केल्ली यांची सही होती. आनंद आणि आश्चर्याने त्या मुलीच्या गालावर अश्रू ओघळले. तिने आपले दोन्ही हात वर करून म्हणाली,
" हे देवा.! तुझे खूप खूप आभार. तुझे प्रेम माणसाच्या हृदयाद्वारे आणि हातांद्वारे न जाणो कुठे- कुठे पर्यंत फैलावले आहे."
जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले कराल आणि चिंताल तर तुमच्या सोबतही तसेच घडेल. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे...
✌️✌️👌👌👍👍
उत्तर द्याहटवा