शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक.
5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. प्रथमतः आई या गुरूला नंतर माझे वडील या गुरूंना आणि ज्यांनी माझे भविष्य घडविले त्या तमाम गुरुवर्याना नमन करून मी भाषणास सुरुवात करतो.
चिखलातला जन्मही
सुंदर सार्थकी लावावा.!
निसर्गासारखा शिक्षक
प्रत्येकाला मिळावा.!!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन‘ म्हणून साजरा करतात.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.
आपल्या गुरु, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. असं म्हणतात की, एक पुस्तक, एक पेन, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक हे संपूर्ण देशाचे भविष्य आहे.
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन सुंदर मूर्ती घडवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सुरेख आकार देऊन संस्कारक्षम भावी पिढी घडविण्याचे महान कार्य करत असतात.
कोरोना काळात शाळा बंद होत्या. तेव्हा कळले शिक्षकांचे महत्त्व. शाळेचे महत्त्व. ऑनलाईन शिक्षण शिक्षकांची कमतरता भरून काढू शकत नाही.
शिक्षक दिन साजरा केलाच पाहिजे. कारण विद्यार्थ्याला अज्ञानातून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून विज्ञानाकडे घेऊन जात उद्याचे भविष्य घडविण्याचे महान कार्य शिक्षकच करत असतात.
अवजारे लोहार बनतो,
दागिने सोनार !
मातीपासून मडके बनवितो,
मेहनत करून कुंभार !!
पण अज्ञानावर घाव घालून विद्यार्थ्यांना स्वयंप्रकाशित करणारे ते फक्त शिक्षकच असतात. माझ्या जीवनातील सर्व गुरुवर्यांना आज शिक्षक दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !!
🙏🙏🙏
खूप छान
उत्तर द्याहटवा