छडी लागे छम छम !
विद्या येई घम घम !!
असे म्हणत चुकी केल्यावर हातावर छडी मारून उठवणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक.
आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 5 सप्टेंबर “डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन” यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो.
पुरातन काळापासूनच गुरूंनी शिष्याचे नाते सलोख्याचे आणि प्रेम भावाचे म्हणून गौरवले जाते. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे.
भारतात प्राचीन काळापासूनच गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात.
म्हणूनच म्हटले आहे –
“गुरु विना कोण दाखवील वाट”
राष्ट्र निर्मितीचा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक होय. जीवन जगताना कितीतरी खडतर प्रसंग येतात. त्यातून तावून, सुलाखून निघण्याचे सामर्थ्य बालपणीच शिक्षकांनी शिकवलेले संचितच पुरविते, बळ देते.
शाळेत शिकत असताना विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धांचे परीक्षण गुरूच्या हाताखालूनच केले गेल्याने तो आत्मविश्वास नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाताना किंवा संकटाच्या वेळी कामास येतो. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान देत नाहीत तर, जीवनात जगण्याचे बाळकडू पाजतात.
म्हणून फक्त आजच नाही, तर रोजच त्यांना सन्मान देऊया. 🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏