आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजनवर्ग, उपस्थित असलेले माझे सर्व मित्र-मैत्रिणींनो आज 5 सप्टेंबर आयुष्याला आधार, आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस.
शि – म्हणजे शिलवान
क्ष – म्हणजे क्षमाक्षिल
क – म्हणजे कर्तव्यदक्ष
अशा सर्व शिक्षकांना वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती.
शिक्षक आपल्याला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. दरवर्षी 05 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकां प्रति सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असते. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान दार्शनिक व्यक्तिमत्व आणि शिक्षक होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चारित्र्य निर्माण करू शकतात.
आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्व घडण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचे महत्त्व समजावण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असते. कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते.
दिया ज्ञान का भंडार हमे,
किया भविष्य के लिए तयार हमे,
हे आभारी उन गुरुओ के हम,
जिसने किया कृतज्ञ अपार हमे.!
शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. गुरु-शिष्य संबंधातील पवित्र भावना लोप पावत आहे.
या संबंधातील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. चला तर मग शिक्षक दिनी त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया.
मेरे जैसे शून्य को,
शून्य का ज्ञान बताया !
हर अंक के साथ शून्य,
जोडणे का महत्व बताया !!
सबके सामने कर सकु बात,
यह विश्वास मुझमे जगाया !
गुरु तेरे उपकार का कैसे चुकाऊ मे मोल,
लाख किमती धन भला,
गुरु है मेरे अनमोल!!
माझ्या जीवनात आलेल्या सर्व शिक्षकांना, गुरूंना वंदन करून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो
शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏