पावसाळ्यामध्ये वीज कडाडत असताना काय दक्षता घ्याल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे
मैदानात, झाडाखाली उभे राहू नका तसेच उंच ठिकाणी, झाडावर चढू नका.
विजेचा खांब, टेलिफोनचा खांब, टॉवर इत्यादीजवळ उभे राहू नका. गाव, शेत, आवार, बाग आणि घर यांच्याभोवतीच्या तारेच्या कंपाउंडला टेकू नका. दुचाकी वाहन, सायकल, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल, तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी एकत्र थांबू नका.
दोन व्यक्तींमध्ये अंदाजे 15 फूट अंतर राहील याची काळजी घ्या.
प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाइल किंवा दूरध्वनीचा वापर करू नका.
पायांखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा.
दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवून तळपायांवर बसा.
पोहणारे, मच्छीमारी करणारे यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा.
पक्के घर सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तडितरक्षक आहे
काही माहिती मिळवा. आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर तडितरक्षक बसवून घ्या.
धन्यवाद शेअर करा 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏