मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, ११ मे, २०२३

staff selection job 2023

 कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठी (CHSL 2023) अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. ज्या उमेदवारांना SSC CHSL 2023 साठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर अर्ज करु शकतात. 

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 09 मे 2023 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2023 आहे. प्रवेशपत्र परीक्षेच्या तारखेच्या 10 ते 15 दिवस आधी जारी केलं जाऊ शकतं हे परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांनी लक्षात घ्यावं.




कर्मचारी निवड आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1600 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यामध्ये निम्न विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे. 

SSC CHSL साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 01-08-2023 नुसार निश्चित करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. यासोबतच यापेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना भारत सरकारच्या सध्याच्या नियमांनुसार सूट दिली जाईल. 

SSC CHSL साठी अर्ज करणाऱ्या खुल्या वर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. तर आरक्षणासाठी पात्र असलेल्या महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD) आणि माजी सैनिक (ESM) यांना फीमधून सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन फी जमा करण्याची अंतिम तारीख 10 जून 2023 ही आहे. जर तुम्ही ऑफलाईन फी जमा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 11 जूनपर्यंत बँकेकडून चलन तयार करावे लागेल. यानंतर तुम्हाला 12 जूनपर्यंत वेळ मिळेल. एकदा भरलेलं शुल्क परत केलं जाणार नाही. 

SSC CHSL अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर, SSC उमेदवारांना 14 जून ते 15 जून 2023 या कालावधीत त्यांच्या अर्जामध्ये आणि फी भरताना झालेल्या चुका सुधारण्यासाठी एक संधी देण्यात येईल. या दरम्यान उमेदवारांना रात्री 11 वाजेपर्यंत वेळ असेल.

SSC CHSL साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान बारावी उत्तीर्ण केलेली असावी.


यावर्षी, एसएससी सीएचएसएल 2022 परीक्षा टियर 1 साठी जवळपास 32 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी फक्त 13 लाख विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा 9 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली. SSC CHSL परीक्षा 2023 टियर 1 ऑगस्ट महिन्यात घेतली जाईल. ही परीक्षा CBT मोडवर आधारित असेल. तर टियर 2 परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले 

लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-2 अंतर्गत 19,900 ते 63,200 रुपये वेतन मिळेल.


डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-4 अंतर्गत 25,500 ते 81,100 रुपये आणि स्तर-5 अंतर्गत 29,200 ते 92,300 रुपये मिळतील.


डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड 'अ' या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर 4 अंतर्गत 25,500 ते 81,100 रुपये पगार मिळेल. 

 ssc.nic.in 


होम पेजवरील 'Apple Now' लिंकवर क्लिक करा आणि नंतर 'CHSL' लिंकवर क्लिक करा.



सर्व तपशील भरा आणि अर्ज फी भरा.


आता अंतिम अर्ज सबमिट करा, सेव करा आणि डाऊनलोड करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट