*शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी यशस्वी झाले म्हणून वर्गशिक्षकाला स्कुटर भेट दिल्याची राज्यातील पहिलीच घटना असावी*
[[ *संजयचा वर्ग हीच निःशुल्क शिक्षणाची अकॅडमी व विद्यानिकेतन*]]
[[( *संजयच्या पायाशी नतमस्तक व्हावे असे सेवाभावी काम*]))
----🙏🙏🙏----
(( *२०१६-१७ सरांना वर्गात बसायला १०,००० रुपयांची खुर्ची भेट दिली होती. २०२२-२३ मध्ये ₹७०,०००/- ची दुचाकी भेट दिली*))
----🙏🙏🙏🙏----
((( *शाळा ही दुसरी आई व वर्ग हेच घर समजून अध्ययन- अध्यापन करणारा अवलिया म्हणजे संजय शिंदे*)))
( *जीव ओतून समर्पित भावनेने सेवा करुन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी केले तर समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोच.*)
{ *शिक्षक संजय शिंदे विद्या मंदिर मुदाळ तालुका भुदरगड यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी वर्षभरात एकही सुट्टी वा रजा न घेता सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत वर्ग घेत होते. सुमारे २५,००० रुपये केवळ प्रश्नपत्रिका झेरॉक्स करुन सोडवण्यासाठी संजय शिंदे सर यांनी स्वतः चे खर्च केले होते*}
[ *सन २०२२-२३ परीक्षेत वर्गातील एकूण १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. तर एक विद्यार्थींची नवोदयसाठी निवड झाली. १८ पैकी राज्यात चवथा, पाचवा व सहावा क्रमांक शिंदेसरांच्या वर्गातील मुलांनी मिळवला आहे.*]
( *सन २०१६-१७ मध्येही सरांचे मुदाळ शाळेतील १६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व दोन विद्यार्थी नवोदयला आले होते.*)
{ *संजय शिंदेसरांचा लॅपटॉप, ग्रंथालय, बोलक्या भिंती, तरंगचित्रे, टीव्ही व डिजिटल असणारा वर्ग म्हणजे गुणवत्तेची हसरी प्रयोगशाळा आहे*}
[ *संजय शिंदे यांनी पदरमोड करून स्वतः प्रश्नपत्रिका तयार केल्या. सर्व प्रश्नपत्रिका मुलांकडून सोडवून घेतल्या आहेत. सुमारे १५० पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मुलांनी सोडवल्या आहेत.*]
{{ *१९८० पासूनच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सरांकडे आहेत. सर्व सोडवून घेतात. परीक्षा परिषदेकडे सुद्धा ४२ वर्षांपासूनच्या प्रश्नपत्रिका असतील असे वाटत नाही.*}}
({ *गरीब कुटुंबांतील, शैक्षणिक वारसा नसलेल्या शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांना स्वतः सर्व शैक्षणिक साहित्य देऊन शिष्यवृत्ती धारक बनवलेले आहे.*})
( *संजय शिंदेसर यांनी आजवर दहा हजारपेक्षा जास्त मुलेमुली व पाच हजारपेक्षा जास्त शिक्षकांना महाराष्ट्रभरात मार्गदर्शन केले आहे. अनेक ठिकाणी समाजभान जपत एकही पैसा न घेता पदरमोड करून आवड म्हणून निस्पृहपणे मार्गदर्शन केले आहे.*)
{ *समंजसपणा, सोज्वळपणा, निर्मोहीपणा व शिष्यवृत्ती परीक्षेतील मास्टरी यामुळे संजय शिंदेसर हे विद्यार्थी, पालक , शिक्षक व अधिकाऱ्यांच्यात लोकप्रिय आहेत.*}
*संजय शिंदेसरांच्या पाचवीच्या वर्गातील पालकांनी कमालच केली आहे. चक्क ७०,००० रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ॲक्टिवा गाडी सन्मानपूर्वक भेट दिली. ग्रामीण भागातील बहुतांशी शेतकरी कुटुंबातील असलेल्या पालकांनी वर्गशिक्षकाला दुचाकी भेट दिल्याचे महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण असावे.*
*संजय शिंदे या अवलियाला सलाम. साष्टांग नमस्कार.*
*संजय शिंदे आपणास व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना*
संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏