मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
जन्म.१५ सप्टेंबर १८६१ कर्नाटक राज्यातील मुद्देनहळ्ळी या गावी.
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती. त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली. गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात. या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली. एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतीला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते. त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले. त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले.
पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला. म्हैसूरच्या नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमा राजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट ,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले. म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.
समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏