५. यवतमाळ जिल्हा टोपण नाव :- पांढऱ्या सोन्याचा (कापसाचा) जिल्हा.
क्षेत्रफळ :- १३, ५९४ चौ. कि. मी.
लोकसंख्या : २६,०६,०६३.
तालुके :- १६- १) यवतमाळ, २) बाभूळगाव, ३) कळंब, ४) केळापूर, ५) राळेगाव, ६) घाटंजी, ७) वणी, ८) मोरगाव, ९) पुसद, १०) महागाव, ११) उमरखेड, १२) दारव्हा,१३) नेर, १४) दिग्रस, १५) आर्णी, १६) झरी-झामडी,
प्रमुख पिके :- कापूस, संत्री, केळी, ऊस, मिरची, गळिताची
धान्ये, कडधान्ये, बाजरी, ज्वारी, मका, तांदूळ इ.
हवामान : उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्य :- ९० सें.मी.
नद्या :- वर्धा, पैनगंगा, अडाण, वाघाडी, विदर्भा, निर्गुणा, बेंबळा, रामगंगा, खुनी, पूस, अरुणावती, निर्गुडा,
पर्वतशिखरे / डोंगररांगा :- पुसदच्या डोंगररांगा, अजिंठ्याचेडोंगर.
अभयारण्ये :- पैनगंगा, टिपेश्वर (राखीव मृगया क्षेत्र).
तीर्थस्थाने :- कळंब (२१ गणेशपीठांपैकी एक. स्वयंभूगणपतीचे स्थान), वणी (रंगनाथस्वामींचे मंदिर व शेषशायी विष्णूची मूर्ती.)दिग्रस (घंटी बाबांची समाधी).
प्रेक्षणीय स्थाने :- कळंब, यवतमाळ (जगत मंदिर व उंबरडा उद्यान प्रेक्षणीय आहे.)
प्रमुख उद्योग :- कोळसा उद्योग, सूत गिरणी, कापड गिरणी,साखर इ.
लोहमार्ग :- मूर्तिजापूर यवतमाळ : नॅरोगेज..मांजरा वणी: ब्रॉडगेज.
राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. ७. हैद्राबाद-जबलपूर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏