ABHA कार्ड
हे कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे तसेच आधार का मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचेच आहे 🙏🙏🙏🙏
https://healthid.ndhm.gov.in/register
ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे सुध्दा हे कार्ड काढू शकता...
आपण ज्या कार्डबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ABHA कार्ड. हे एक डिजिटल कार्ड आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड जतन करू शकता. म्हणजे तुम्ही कधी आजारी पडलात, तुम्ही कोणत्या डॉक्टरांना दाखवले, कोणत्या तपासण्या करायच्या आदी सर्व प्रकारची माहिती या कार्डमधे असणार आहे. हे कार्ड कोणालाही बनवता येईल.
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटचा फायदा असा होतो की, तुमचे वैद्यकीय अहवाल, औषधांचे प्रिस्क्रिप्शन, रक्तगटाची माहिती, डॉक्टरांची माहिती इत्यादी या डिजिटल कार्डमध्ये सेव्ह असते. यामुळे तुम्हाला दवाखान्यात जाताना रिपोर्ट फाईल किंवा औषधांचे प्रिस्क्रिप्शन सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
रुग्णाची सर्व मेडिकल हिस्ट्री 'आभा' कार्डमध्ये जतन केली जाते. यामध्ये तुमच्या रक्तगटाचे, लॅब चाचण्या आणि सर्व चाचण्यांचे अहवाल असतील. यामुळे रुग्णालये, दवाखाने आणि विमा कंपन्यांसोबत वैद्यकीय नोंदी सहज शेअर करणे शक्य होईल.
कार्डमुळे रुग्णाची सर्व वैद्यकीय माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना वाट पहावी लागत नाही. वेळीच उपचार सुरू झाल्यास रुग्णाचा जीव वाचवणे सोपे होते.
'आभा' कार्ड
आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला ABHA अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करावे लागेल. पूर्वी हे अॅप NDHM हेल्थ रेकॉर्ड अॅप म्हणून ओळखले जात होते. तुम्ही इथून ABHA APP डाउनलोड करून आवश्यक माहिती भरून तुमचे हेल्थ कार्ड बनवू शकता.
खालील लिंक वरती क्लिक करा .
या हेल्थ आयडी पोर्टलवर देखील तुम्ही कार्डसाठी अर्ज करू शकता. याठिकाणी आवश्यक माहिती भरून तुम्ही कार्ड मिळवू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏