अकोला जिल्हा
क्षेत्रफळ :- ५,४३१ चौ. कि. मी.
लोकसंख्या : २६,२९,३०५.
तालुके : :- ७- १) अकोला, २) बार्शी टाकळी, ३) अकोट, ४) तेल्हारा, ५) बाळापूर, ६) पातूर, ७) मूर्तिजापूर.
प्रमुख पिके :- कापूस, गहू, ज्वारी, मका, गळिताची पिके,
मोसंबी इ.
हवामान : उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ८५ सें.मी.
नद्या :- पूर्णा, काटेपूर्णा, निर्गुणा, मन, मोर्णा, आस, भिकुंड,
उतावळी, विश्वामित्री, गांधारी, उमा, पेढी.
पर्वतशिखरे / डोंगररांगा :- अजिंठ्याचे डोंगर, गाविलगडचे
डोंगर.
अभयारण्य :- नरनाळा, काटेपूर्णा. लेणी :- पातूर (बौद्ध लेणी).
तीर्थस्थाने :- अकोला (राजराजेश्वर मंदिर), अकोट (नरसिंह
महाराजांचे क्षेत्र), मूर्तिजापूर (गाडगे महाराजांचा आश्रम). ऐतिहासिक स्थाने :- बाळापूर (मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री). अकोला.
प्रेक्षणीय स्थाने :- नरनाळा अभयारण्य, पातूर बौद्ध लेणी,
बार्शी टाकळी (हेमाडपंथी मंदिर ). किल्ले :- नरनाळा किल्ला, बाळापूर, अकोला.
शैक्षणिक संस्था (विद्यापीठे) :- डॉ. पंजाबराव कृषी
विद्यापीठ.
प्रमुख उद्योग :- सुती कापड, वनस्पती तूपनिर्मिती, साबण उद्योग, तेल गिरणी, फरशी व कौले, यंत्रमाग, जरीचे कापड, सतरंज्या इ.
ऊर्जा प्रकल्प :- पारस औष्णिक ऊर्जा प्रकल्प, पारस.
लोहमार्ग :- मुंबई भुसावळ-हावडा ब्रॉडगेज. -
मूर्तिजापूर- अचलपूर : नॅरोगेज.
मूर्तिजापूर यवतमाळ : नॅरोगेज. खांडवा हिंगोली मीटरगेज.
महामार्ग.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ - सुरत - कोलकाता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏