उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थान निझाम मीर आसमान अली खान च्या नावावरून पडले. उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते.आता पुन्हा महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये धाराशिव असे नामांतर केले..
टोपण नाव :- श्री भवानी मातेचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- ७,५५० चौ. कि. मी. लोकसंख्या :- १४, ७२, २५६.
तालुके : :- ८- १) उस्मानाबाद, २) उमरगा, ३) लोहारा, ४) तुळजापूर, ५) भूम, ६) परंडा, ७) कळंब, ८) वाशी.
हवामान :- उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्य :- ८० सें.मी.
प्रमुख पिके :- गहू, तूर, ज्वारी, मका, बाजरी, कडधान्ये, कापूस, भुईमूग, गळिताची धान्ये, तंबाखू, एरंडी.
नद्या :- मांजरा, तेरणा, बोरी, सीना, तावरजा. पर्वत / डोंगररांगा :- बालाघाटचे डोंगर, नळदुर्गचे डोंगर, तुळजापूरच्या टेकड्या.
लेणी :- धाराशीव.
अभयारण्य :- रामलिंग.
तीर्थस्थाने :- तुळजापूर (साडेतीन शक्तीपीठापैकी एक, तुळजाभवानी), कुंथलगिरी (जैन धर्मीयांचे पवित्र क्षेत्र, जैनमुनीशांती सागर यांची समाधी), तेर (संत गोरा कुंभार यांचे वास्तव्यस्थान), डोमगाव (कल्याण स्वामींची समाधी), भूम (आलम प्रभूचे मंदिर).
ऐतिहासिक स्थाने :- उस्मानाबाद (प्राचीन धाराशिव), नळदुर्ग (चालुक्य राजाने बांधलेला ऐतिहासिक भुईकोट किल्ला), परंडा (महम्मद गवानने बांधलेला किल्ला), तुळजापूर (छत्रपती शिवरायांचे कुलदैवत), तेर (प्राचीन तगर सातव्या शतकातील . स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध, १५०० त्रिविक्रम मंदिर).
प्रेक्षणिय स्थाने :- रामलिंग, तेर (उत्तरेश्वराच्या प्राचीन मंदिराचे नक्षीकाम व वस्तुसंग्रहालय), तुळजापूर, नागझरी, परंडा, नळदुर्ग, उस्मानाबाद (धाराशिवची लेणी).
किल्ले :- परंडा, नळदुर्ग. जिल्ह्यातील प्रमुख उद्योग :- तांबा-पितळेची भांडी, लोकर, हातमाग, तेल गाळणे, साखर उद्योग, कातडी उद्योग इ.
राष्ट्रीय महामार्ग :- १) राष्ट्रीय महामार्ग क्र. ९, (पुणे-सोलापूर-हैद्राबाद महामार्ग.)
२) राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ (सोलापूर-धुळे महामार्ग.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏