लातूर जिल्हा
क्षेत्रफळ :- ७,१६६ चौ. कि.मी. लोकसंख्या :- २०,७८, २३७.
तालुके :- १० - १) लातूर, २) अहमदपूर, ३) उद्गीर, ४) निलंगा, ५) औसा, ६) चाकूर, ७) रेणापूर, ८) देवणी,
९) शिरुर अनंतपाळ, १०) जळकोट. हवामान :- उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्य :- ८० सें.मी.
प्रमुख पिके :- ज्वारी, बाजरी, कापूस, कडधान्ये, गळिताची
पिके, ऊस, तंबाखू.
नद्या :- मांजरा, तेरणा, मन्याड, तावरजा, लेंडी, धरणी. पर्वत / डोंगररांगा :- बालाघाटचे डोंगर. अभयारण्ये :- रामलिंग. लेणी :- खरोसा (इ. स. ६ व्या शतकातील कोरीव लेणी).
तीर्थस्थाने :- औसा (मल्लिनाथ महाराजांचा मठ, संतकवी जीवनदासांचे जन्मस्थान ) लातूर (सिद्धेश्वर मंदिर, जैन धर्मपीठ, हजरतसुरशाहवली दर्गा),
हलीबेट (गंगाराम महाराजांची समाधी), शिरूर अनंतपाळ.
किल्ले :- उदगीर, औसा. इतिहासप्रसिद्ध शहर:- लातूर (प्राचीन सातवाहन व राष्ट्रकूटकालीन शहर).
प्रेक्षणीय ठिकाणे :- हत्ती बेट, खरोसा,
प्रमुख उद्योग :- तेल घाणी, कापूस उद्योग, सूत गिरण्या, डाळीचे कारखाने, वनस्पती तुपाचे उत्पादन.
धरण प्रकल्प : माकणी प्रकल्प.
लोहमार्ग :- विकाराबाद-परळी-ब्रॉडगेज.
संत :- संत जीवनदास, मल्लीनाथ महाराज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏