औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर असे केले आहे...
टोपण नाव :- लेण्यांचा जिल्हा.
क्षेत्रफळ :- १०,१०६ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- २९, २०, ५४८.
तालुके :- :- ९ - १) औरंगाबाद, २) खुलताबाद, ३) कन्नड, ४) सोयगाव, ५) सिल्लोड, ६) पैठण, ७) गंगापूर, ८) वैजापूर,
९) फुलंब्री.
हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ७५ सें.मी.
प्रमुख पिके : बाजरी, ज्वारी, मका, तूर, भुईमूग, कापूस, ऊस, तीळ, तंबाखू, एरंडी, सीताफळ, मोसंबी, द्राक्षे.
नद्या: पूर्णा, केळणा, दुधना, सुखना, गोदावरी, खाम, बाघूर,
शिवना.
पर्वतशिखरे, डोंगररांगा :- अजिंठ्याचे डोंगर, सातमाळा डोंगर, सूरपालनाथ डोंगर. अभयारण्य :- गौताळा अभयारण्य (औट्रम घाट),जायकवाडी पक्षी अभयारण्य.
लेणी :- अजंठा, वेरुळ, पितळखोरा, औरंगाबाद लेणी. थंड हवेचे ठिकाण :- • म्हैसमाळ.
तीर्थस्थाने :- पैठण (संत एकनाथांची कर्मभूमी, दक्षिण काशी, आपेगाव (संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान),
बेरूळ (घृष्णेश्वर - १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक), किचनेर (श्री क्षेत्र चिंतामणी पार्श्वनाथाचे क्षेत्र), शेंद्रा केळगाव, मुर्डेश्वर, गंगापूर इ. शुलीभंजन (मार्कंडेय ऋषींचे व संत एकनाथांचे तपस्या स्थान, दत्तस्थान).
ऐतिहासिक स्थाने :- दौलताबाद (देवगिरीचा किल्ला), खुलताबाद (औरंगजेबाची कबर)
औरंगाबाद, बेरूळ (भोसले घराण्याचे मूळ गाव).
प्रेक्षणीय ठिकाण :- औरंगाबाद (बिबीका मकबरा, दवनचक्की, सुनहरा पार्क, औरंगाबाद लेणी, खुल्ताबाद (औरंगजेबची कबर), गौताळा अभयारण्ये, वेरुळ, पैठण (संत ज्ञानेश्वर उद्यान), पितळखोरा (बौद्ध लेण्या), म्हैसमाळा (थंड हवेचे
ठिकाण), शुलीभंजन (निसर्गरम्य ठिकाण). "किल्ले :- दौलताबाद, वेताळवाडी. आदिवासी :- लमाण.
शैक्षणिक संस्था :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
संशोधन संस्था : वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (WALMI)
प्रमुख उद्योग :- सुती वस्त्रोद्योग, पैठणी उद्योग (पैठण), हिमरूशाली (औरंगाबाद), दुचाकी, तीन चाकी वाहन उद्योग, दूरदर्शन संच निर्मिती, साखर, प्लॅस्टिक, यंत्रसामग्री, जरीकाम इ. धरण प्रकल्प :- जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय). जलविद्युत प्रकल्प :- जायकवाडी प्रकल्प.
लोहमार्ग :- मनमाड - काचीगुडा-ब्रॉडगेज. राष्ट्रीय महामार्ग :- सोलापूर रा. म. क्र. २११ (धुळे- औरंगाबाद).
संत :- संत एकनाथ (पैठण). .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏