बीड जिल्हा
टोपण नाव :- जुन्या कवींचा जिल्हा, देवदेवळांचा जिल्हा. क्षेत्रफळ :- १०,६९२ चौ. कि. मी.
लोकसंख्या : २१,५९,८४१.
तालुके :- ११ - १) बीड, २) गेवराई, ३) माजलगाव, ४) अंबेजोगाई, ५) केज, ६) पाटोदा, ७) आष्टी, ८) धारूर, ९) परळी, १०) वडवणी, ११) शिरुर कासार.
हवामान : उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ६५ सें.मी.
प्रमुख पिके :- बाजरी, कापूस, वाटाणा, तूरडाळ, ऊस,
तीळ, एरंडी, तंबाखू, भुईमूग, द्राक्षे, हरभरा, करडई. नद्या :- बिंदूसरा, सिंदफणा, गोदावरी, कुंडलिका, सरस्वती,
सीना मांजरा, माण नदी. डोंगररांगा :- बालाघाटचे डोंगर,
धबधबे :- सौताडा.
अभयारण्ये : नायगाव.
लेणी :- परळी वैजनाथ,
तीर्थस्थाने :- अंबेजोगाई (जोगाईचे प्रसिद्ध मंदिर), आद्यकवी मुकुंदराज व दासोपंत यांची जन्मभूमी, बीड (प्राचीन चंपावती नगरी, कंकाळेश्वराचे मंदिर), मांजरसुंबा(मन्वथ स्वामींची समाधी), गहिनीनाथ गड (गहिनीनाथांचे मंदिर), परळी वैजनाथ (बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, • कोरीव लेणी, अमलेश्वर महादेव मंदिर), पांचाळेश्वर, नारायण गड इ. राक्षसभुवन (२१ गणेशपीठोंपैकी एक).
ऐतिहासिक स्थाने :- राक्षस भुवन, किल्ले धारूर, शैक्षणिक संस्था :- वैद्यकीय महाविद्यालय, अंबेजोगाई.
औष्णिक विद्युत केंद्र :- परळी वैजनाथ.
औद्योगिक उत्पादने :- धातूची भांडी, साखर, हातमाग कापड, , तेल गाळणे, चर्मोद्योग, साबण उत्पादन इ.
धरण प्रकल्प : माजलगाव (सिंदफणा नदीवर), पाली, शिरापूर, मांजरा धरण इ.
लोहमार्ग :- परळीवैजनाथ- परभणी (ब्रॉडगेज) विकाराबाद- परळी वैजनाथ.
राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ सोलापूर- बीड- औरंगाबाद-धुळे
संत व कवी :- दासोपंत आद्यकवी मुकुंदराज, मन्वथ स्वामी, महदंबा (मराठीतील पहिली कवयित्री).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏