जालना जिल्हा
टोपण नाव :- संतांची भूमी.
क्षेत्रफळ :- ७,७१५ चौ. कि. मी. लोकसंख्या :- १६, १२,३५७
तालुके :- ८ १) जालना, २) अंबड, ३) जाफ्राबाद,
४) परतूर, ५) भोकरदन, ६) बदनापूर, ७) घनसावंगी, ८) मंठा.
हवामान :- उष्ण व कोरडे. सरासरी पर्जन्य :- ७० सें.मी.
प्रमुख पिके :- ज्वारी, तीळ, कडधान्ये, मका, कापूस, ऊस, मिरची, तंबाखू, बाजरी इ. नद्या :- खेळणा, धामणा, पूर्णा, कुंडलिका, दुधना, गोदावरी,
जुई, गिरजा, गुलाटी इ. डोंगररांगा :- अजिंठ्यांची डोंगररांग, जांबूवंत टेकडी इ. तीर्थस्थाने :- जांबसमर्थे (संत रामदास स्वामींचे जन्मगाव),
जालना (महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामींचे वास्तव स्थान),
अंबड (मत्स्योदरी मंदिर, खंडोबाचे मंदिर), जांबुवंत गड. डोणगाव (बोहरी समाजाचे मौलाना नुरूद्दीन यांचा दर्जा), राजूर ( गणेश मंदिर), जयदेववाडी (महानुभव पंथाचे पवित्र स्थान).
ऐतिहासिक स्थाने :- जालना.
किल्ले :- जालना.
प्रमुख उद्योग :- घोंगड्या विणणे, हातमाग, तेल गाळणे, सिमेंट पाईप, यंत्रसामग्री, साखर.
लोहमार्ग :- मनमाड- काचिगुडा-ब्रॉडगेज. प्रशिक्षण केंद्र :- पोलिस प्रशिक्षण केंद्र, जालना. राष्ट्रीय महामार्ग :- राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ (सोलापूर- औरंगाबाद-धुळे ).
संत :- रामदास स्वामी, आनंदस्वामी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏