सांगली जिल्हा
क्षेत्रफळ : ८,५७८ चा कि. मी.
लोकसंख्या : २५,८१,८३५
तालुके : एकूण ९. मिरज, तासगाव, पलुस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे-महांकाळ, वाळवा, शिराळा. तालुक्यांची मुख्यालये विटे (खानापूर), इस्लामपूर
(वाळवा), बत्तीस शिराळे (शिराळे).
हवामान उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्यमान : ५२ से. मी.
नद्या : कृष्णा, येरळा, वारणा, माणगंगा.
पर्वत, शिखरे, डोंगररांगा : शंभूमहादेवाचा डोंगर, आष्टा, दांडोबा डोंगररांग, मल्लिकार्जुन मुचुंडी.
खनिजे : बॉक्साइट.
कृषी पिके : भुईमूग, तंबाखू, हळद, ज्वारी, बाजरी, मका, मिरची, द्राक्षे, ऊस इत्यादी.
कृषी बाजारपेठा : हळद (सांगली), द्राक्षे (तासगाव).
औद्योगिक उत्पादने : साखर, पंप, मशिनरी, धातूची भांडी, शेतीची अवजारे, घोंगड्या.
वनोद्यान : दांडोबा डोंगर.
अभयारण्ये : सागरेश्वर (हरणांसाठी राखीव)
वनोद्यान : दांडोबा डोंगर.
अभयारण्ये सागरेश्वर (हरणांसाठी राखीव), प्राचीन नाव : अंबिका वन (सागरेश्वर डोंगर), चांदोली अभयारण्य ( वारणा नदीच्या धरण परिसरात ). अलीकडेच नोव्हें. २००४ मध्ये या अभयारण्याला राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण प्राणी : बॉनेट मंकी, (चांदोली अभयारण्य). डोंगरी किल्ले : मच्छिंद्रगड, प्रचितगड, रामगड, बागणी, गणेशदुर्ग, मिरज.
भुईकोट किल्ले: गणेश दुर्ग, मिरज,
तीर्थक्षेत्रे : औदुंबर (ता. तासगाव), दत्तात्रयांचे जागृत स्थान, बत्तीस शिराळा (वैशिष्ट्यपूर्ण नागपंचमी) कवठेमहांकाठ, ब्रह्मनाळ (कृष्णा येरळा संगम) कोळे नृसिंहपूर, मच्छिंद्रगड, सांगली (गणपती मंदिर), वारणा, जत ( यल्लमादेवी) रेवणसिद्ध हरिपूर (कृष्णा वारणा संगम), बहे (रामलिंग), खमसुंडी, तासगाव (उजव्या सोंडेचा गणपती)
ऐतिहासिक स्थळे : मिरज, सांगली, इस्लामपूर, देवराष्ट्रे. नदीकाठची तीर्थक्षेत्रे औदुंबर (कृष्णा), मिरज (कृष्णा), सांगली (कृष्णा), ब्रह्मनाळ (कृष्णा-रेवळा)
प्रेक्षणीय ठिकाणे : नृसिंहपूर, बत्तीस शिराळे, सागरेश्वर अभयारण्ये, चांदोली अभयारण्य औदुंबर, वसंतसागर, जलाशय ( वारणा धरण )
धरण प्रकल्प ताकारी म्हैसाळ प्रकल्प, वज्रचौंडे धरण ( अग्रणी नदीवर)
औद्योगिक ठिकाणे सांगली, मिरज, माधवनगर, किर्लोस्करवाडी, इस्लामपूर,
हातमाग केंद्रे : सांगली, मिरज, माधवनगर, दूधगाव, कुंडल, आटपाडी.
साखर कारखाने : सांगली ( वसंतदादा शेतकरी), यशवंतनगर (विलासराव नाईक), साखळे, वाळवा (राजारामबापू पाटील), वाळवा (हुतात्मा किसनराव अहीर), नागेवाडी, खानापूर (यशवंत), आटपाडी (माणगंगा), तासगाव (तासगाव), जत (राजे विजयसिंह डफळे), वांगी, ता. खानापूर (सोनहिरा), रायगाव (डोंगराई सागरेश्वर), कोकरूड, ता. शिराळा (निनाईदेवी), आरग, ता. मिरज, (मोहनराव शिंदे सहकारी कारखाना), कुंडल (क्रांती सह कारंदवाडी), ता. वाळवा (सर्वोदय सहकारी साखर कारखाना).
लोहमार्ग : पुणे-मिरज, (ब्रॉडगेज), मिरज-लोंढा (ब्रॉडगेज), मिरज-कोल्हापूर (ब्रॉडगेज).
राष्ट्रीय महामार्ग पुणे बेंगलोर NH4
क्रांतिकारक वसंत दादा पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏