KOLHAPUR कोल्हापूर
टोपण नाव: गुळाचा जिल्हा, कुस्तीगीरांचा जिल्हा.
क्षेत्रफळ : ७,६१२ चौ. कि. मी.
लोकसंख्या : ३५,१५,४१३
तालुके : एकूण १२ करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भूदरगड, राधानगरी, बावडा, शाहूवाडी.
तालुक्यांची मुख्यालये : करवीर (कोल्हापूर), बावडा ( गगनबावडा).
हवामान उष्ण व कोरडे (पश्चिमेकडे थंड)
सरासरी पर्जन्यमान : १९४ से. मी.
नद्या : कृष्णा, वारणा, भोगावती, कासारी, तुळशी, दूधगंगा, कुंभी वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, शुक, पंचगंगा. पर्वत - डोंगररांगा, शिखरे सह्याद्री पर्वत, पन्हाळा, , जोतीबाचा
डोंगर. घाट रस्ते : आंबोली घाट (कोल्हापूर-सावंतवाडी), आंबा
घाट (कोल्हापूर - रत्नागिरी), बावडा घाट (गगनबावडा - खारेपाटण )
खनिजे : बॉक्साईट.
कृषी पिके : तंबाखू, ऊस, गहू, ज्वारी, मिरची, भुईमूग, बाजरी,
नाचणी, तीळ, वरई, हळद.
कृषी बाजारपेठा : कोल्हापूर, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा, कोल्हापूर, जयसिंगपूर.
औद्योगिक उत्पादने : साखर, गूळ, डिझेल इंजिने, पंप सेटस्, मशिनरी, चामड्याच्या वस्तू, शेतीची अवजारे, तंबाखू उद्योग, चांदीचे दागिने, कापड, सूत.
हातमाग केंद्रे : कोल्हापूर, इचलकरंजी, रेंदाळ, कुरुंदवाड, कोडोली, बडगाव, कागल.
वनोद्यान तबक बाग, पन्हाळा, बडणगे, आळते हातकणंगले.
अभयारण्ये दाजी पीर, राधानगरी (गव्यांसाठी प्रसिद्ध). वैशिष्ट्यपूर्ण प्राणी : गवा (राधानगरी अभयारण्यात आढळतो.)
भुईकोट किल्ले : कोल्हापूर.
किल्ले (डोंगरी) : पन्हाळा, विशालगड, भूदरगड, रांगणा,
मनोहर गड, पारगड.
थंड हवेची ठिकाणे पन्हाळा, राधानगरी,
तीर्थक्षेत्रे कोल्हापूर (करवीरनगरी), अंबाबाईचे मंदिर (साडेतीन शक्तिपीठांपैकी एक), जोतीबा (जोतीबाचा डोंगर), कोल्हापूरपासून १७ कि. मी. वर नृसिंहवाडी (नरसोबाचीवाडी) दत्ताचे जागृत स्थान, बाहुबली (जैनांचे प्रसिद्ध यात्रा स्थान), खिद्रापूर (कपिलेश्वराचे मंदिर), आजरा (रोझरी चर्च), पारगाव, मानपाळे (मारुतीचे स्थान ), रामतीर्थं प्रयाग, कुंभोज काडसिद्धेश्वर,
ऐतिहासिक स्थळे : पन्हाळा, कोल्हापूर, विशालगड, रांगणा, कागल-गारगोटी.
नदीकाठची व संगमावरील धार्मिक स्थळे : गारगोटी (वेदगंगा), कोल्हापूर (पंचगंगा), खिद्रापूर (कृष्णा), नरसोबावाडी (कृष्णा-पंचगंगा संगम).
प्रेक्षणीय ठिकाणे : कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर), टाऊन हॉल म्युझियम, रंकाळा तलाव, पद्मिनी पॅलेस (नवा राजवाडा), पन्हाळा, जोतीबा, राधानगरी, नृसिंहवाडी, भूदरगड, आजरा, विशालगड, बाहुबली.
धरण प्रकल्प लखमापूर, केळोशी, कुरुंदवाडी, राधानगरी (ता. राधानगरी), आसनगाव (ता. राधानगरी), केळोशी (ता. गगनबावडा), कुरुंदवाड (ता. शिरोळ).
विद्युत प्रकल्प : राधानगरी जलविद्युत केंद्र. साखर कारखाने परीते शाहूनगर (भोगावती), कागल (श्री छत्रपती शाहू), शिरोळ (श्री दत्त शेतकरी सहकारी), यशवंतनगर (दौलत शेतकरी), मौनीनगर बिद्री (दूधगंगा, वेदगंगा) हरळी, गडहिंग्लज, कुडीत्रे (कुंभी कासारी), इचलकरंजी (देशभक्त रत्नाप्पा कुंभार, पंचगंगा), वारणानगर (तात्यासाहेब कोरे), कसबा बावडा (छत्रपती राजाराम), हुपरी (जवाहर शेतकरी), गवसे, ता. आजरा (आजरा शेतकरी), हमीदवाडा, ता. कागल (सदाशिवराव मंडलिक कागल सह. हातकणंगले (शरद सह.) पळसंबे, ता. गगनबावडा (डॉ. डी. वाय. पाटील सह.) धामुड, ता. राधानगरी (सह्याद्री सह.), तांबाळे, ता. भूदरगड (इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सह. साखर कारखाना, सोनवडे बांबवडे
प्रमुख शैक्षणिक संस्था : विवेकानंद शैक्षणिक संस्था, शिवाजी विद्यापीठ व वनौषधी विद्यापीठ संस्था.
क्रांतिकारक : चिमासाहेब, रामजी शिरसाठ.
थोर समाजसुधारक : शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏