जळगाव जिल्हा
टोपणनाव :- अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार, केळीचे आगर, कापसाचे शेत.
क्षेत्रफळ :-
११,७५७ चौ. कि. मी.
लोकसंख्या :- ३६, ७९, ९३६
तालुके :- १५ - १) जळगांव, २) चोपडा, ३) यावल, ४) रावेर, ५) मुक्ताईनगर, ६) भुसावळ, ७) बोदवड, ८) जामनेर, ९) पाचोरा, १०) चाळीसगाव, ११) भडगाव, १२) पारोळा, १३) एरंडोल, १४) धरणगाव, १५) अंमळनेर.
हवामान :- उष्ण व कोरडे.
सरासरी पर्जन्य :- ७४ सें.मी.
प्रमुख पिके :- कापूस, केळी, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, ऊस, मिरची, तीळ, भुईमूग, संत्रा, मोसंबी, द्राक्षे इ. नद्या :- तापी, पूर्णा, बोरी, गिरणा, चित्तूर भोगावती, पांझरा, वाघूर इ.
पर्वतशिखरे, डोंगररांगा :- सातमाळा डोंगररांगा, हस्तीचे डोंगर, शिरसोळी डोंगर, अजिंठ्याचे डोंगर, सातपुडा पर्वत रांगा. धबधबे :- मनुदेवी धबधबा (सातपुडा डोंगररांग). अभयारण्य :- पाल यावल अभयारण्ये.
तलाव :- अंमळनेर
पवित्र संगमस्थाने :- चांगदेव (तापी-पूर्णा संगमावर).
जिल्हानिहाय माहिती
गरम पाण्याचे झरे :- उनुपदेव व सुनपदेव.
तीर्थस्थाने :- कोथळी (मुक्ताबाईची समाधी), चांगदेव, अंमळनेर (सतीचा खांब, खार्टेश्वराचे व वरुणेश्वराचे मंदिर), चोखड (एकमुखी दत्तमंदिर), पद्मालय (गणपती मंदिर), पाटणादेवी इ. प्रेक्षणीय स्थाने पाटणादेवी (निसर्गरम्य ठिकाण), पाल- : यावल अभयारण्ये.
किल्ले :- पारोळा (भुईकोट किल्ला).
ऐतिहासिक स्थान :- पारोळे (झाशीच्या राणीचे माहेर), एरंडोल (जुनी एकचक्रानगरी), अंमळनेर (साने गुरुजींची कर्मभूमी), रावेर (पहिल्या बाजीराव पेशव्यांची समाधी ). -
प्रमुख उद्योग :- लष्करी सामग्री ( वरणगाव), हातकागद (एरंडोल), बैलगाड्या बनविण्याचा उद्योग (चोपडे), वनस्पती तेलाचा कारखाना (पाचोरे), केळी निर्यात (भुसावळ), काचेच्या बांगड्या (नासिराबाद).
प्रमुख लोहमार्ग :- मुंबई-भुसावळ- दिल्ली-ब्रॉडगेज. मुंबई-हावडा ब्रॉडगेज, भुसावळ-सुरत-ब्रॉडगेज. पाचोरा-जामनेर-नॅरोगेज. चाळीसगाव-धुळे-ब्रॉडगेज. राष्ट्रीय महामार्ग : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत- कोलकाता)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏