७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म नागरी पुरस्कारांची करण्यात आली आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे.
यामध्ये एकूण १०६ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांपैकी ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री जाहीर झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकाचा समावेश आहे
सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन 💐💐🌹🌹 आणि खूप खूप 💐💐🌹🌹💐💐🌹🌹👌
-पद्म विभूषण-
डॉ. दिलीप महलानाबीस (मरणोत्तर)
झाकीर हुसेन (कला)
एस. एम. कृष्णा (पब्लिक अफेअर्स)
बाळकृष्ण दोषी (मरणोत्तर)
श्रीनिवास वर्धन
मुलायमसिंह यादव
पद्मभूषण-
एस.एल. भैरप्पा
कुमार मंगलम बिर्ला
दीपक धार
वाणी जयराम
स्वामी चिन्ना जियर
सुमन कल्याणपूर
कपिल कपूर
सुधा मूर्ती
कमलेश दी. पटेल
पद्मश्री
91 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील भिकुजी इदाते (समाजसेवा), प्रा. प्रभाकर मांडे (साहित्यिक, समीक्षक), राकेश झुनझुनवाला (उद्योगपती), परशुराम खुणे (झाडीपट्टी रंगभूमी कलाकार), रमेश पतंगे (साहित्यिक), गजानन जगन्नाथ माने (समाजसेवक), रविना टंडन (अभिनेत्री), कोमी नरिमन वाडिया (कला) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सुकामा आचार्य (अध्यात्म, हरयाणा), व्ही. पी. अप्पुकुट्टन पोडुवल (गांधीवादी विचारवंत, केरळ), 98 वर्षीय तुला राम उप्रेती (जैविक शेती, सिक्कीम), 102 वर्षीय मंगला कांती रॉय (सरिंदा वादक, पश्चिम बंगाल), जोधाबाई बायगा (कला, मध्य प्रदेश), मुनीश्वर चंदावार (वैद्यकीय, मध्य प्रदेश), राधाचरण गुप्ता (लेखक, उत्तर प्रदेश), अहमद हुसैन, मोहम्मद हुसैन (कला, राजस्थान), रतन चंद्राकार (वैद्यकीय, अंदमान-निकोबार), आरिझ खंबाटा (उद्योगपती, गुजरात), हेमचंद्र गोस्वामी (कला, आसाम), प्रीतीकाना गोस्वामी (कला, पश्चिम बंगाल), बिकराम बहादुर जमातिया (समाजसेवा, त्रिपुरा) आदींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏