दिनांक 16/09/2019 रोजी मी दरेतांब शाळा तालुका महाबलेश्वर मधून कार्यमुक्त होऊन कोरेगाव मधील सुभाषनगर शाळेत हजर झालो . सव्वा दोन वर्ष महाबलेश्वर मध्ये काम करताना खुप अनुभव आले . महाबलेश्वर मधील तापोळा, गाढवली, दरेताम्ब, येथील नैसर्गिक वातावरण खुप प्रसन्न, आरोग्यदायी, सकारामत्मक असल्यामुळे शाळेत काम करताना खुप छान वाटले. शिवसागर जलशयात पोहण्याचा आनंद कधीच विसरता येणार नाही. तसेच केंद्रातील शिक्षक यांची टीम घेऊन वासोटा किल्ला नागेश्वरी मंदिर पाहण्याचा आनंद घेता आला. तसेच बोटीतून, लाँच मधून फिरण्याचा मनमुराद आनंद घेता आला. मिनी काश्मीर तापोळा येथील शांतता , सौंदर्य आणि फणसाच्या गरा असतो तशी प्रेमळ माणस जगाच्या पाठीवर कोठेही भेटणार नाहीत. त्याच प्रमाणे मनसोक्त स्टॉबेरी, करवंदे , जांबळे आंबे खाण्याचा योग आला.
मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. खासदार श्रीकांत शिंदे साहेब , दरेताम्ब, गाढवली ग्रामस्थ यांचे खुप मार्गदर्शन, प्रेम व सहकार्य मिळाले. शाळेमध्ये खुप नवनवीन उपक्रम राबवताना खुप आनंद मिळाला . लेझीम नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम , वनभोजन, परिसर सहल तंबाखु मुक्त शाळा, मूल्यवर्धन, विविध स्पर्धा, परसबाग, वृक्षारोपण, फनी गेम्स , ई -लर्निंग असे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली, सर्वांच्या सहकार्याने संगणक प्रिंटर, वॉटर फ़िल्टर, वह्या, दप्तरे, ड्रम , ढ़ोल ताश्या, स्पीकर सेट, कपाट अश्या अनेक वस्तु शाळेला प्राप्त केल्या.
मा.पळसे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि मा. जाधव साहेब मा. चिकने साहेब मा. बावळेकर साहेब, जेष्ठ बंधू दिपक भुजबळ, सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शना मुळे मी केलेल्या कामाबद्दल मला पोहोच पावती म्हणून मला सन 2019 चा महाबलेश्वर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खुप आभारी असून कायम आपल्या ऋणात राहणे पसंत करेन .
आपलाच, विजयकुमार किसन भुजबळ मोबाइल 9421177738