छोटी चूक मोठे संकट
पूर्वीच्या काळी युद्धात घोडेस्वारांना फार महत्त्व होते. पायदळ, घोडदळ ही सैन्याची प्रमुख अंगे होती. त्यामुळे ही दोन्ही दळे सदा सज्ज असत. सेनापती घोड्यावर स्वार होऊन युद्धात भाग घेई. एका सेनापतीची ही कहाणी आहे. त्याचा घोडा खूप उमदा व चपळ होता. घोड्याच्या चारही पायांना नाल ठोकले होते; पण त्यातील एका नालाचा एक खिळा पडला होता. तो ताबडतोब ठोकून घेणे आवश्यक होते; पण घोड्याच्या मोतद्दाराने तिकडे दुर्लक्ष केले. अचानक शत्रूने हल्ला केला. सेनापती तातडीने स्वार होऊन निघाला. तुंबळ युद्ध झाले. घोड्याचा एक नाल खिळखिळा होऊन निघाला. घोडा लंगडू लागला. युद्धात घोडा जखमी झाला.
घोडा नसल्याने सेनापती मारला गेला. सेनापती मारला गेल्याने, सेनेचा पराभव झाला. एका खिळ्याच्या अभावाने नाल निघाला, नाल नसल्याने घोडा निकामी झाला. घोडा नसल्याने, सेनापती मेला. सेनापती मेल्याने सेना हरली.
बोध तात्पर्य
वेळीच दुरुस्ती न केल्याने मोठे नुकसान होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏