तहानलेला कावळा
उन्हाळ्याचे दिवस होते. एक कावळा पाण्याच्या शोधात इकडे तिकडे उडत होता. त्याच्या घशाला कोरड पडली होती. खूप तहान लागली होती. त्याला एके ठिकाणी पाण्याचा रांजण दिसला. तेथे तो जाऊन पहातो, तर रांजणामध्ये पाणी पार तळाला होते. त्याने वाकून पाहिले, तर त्याची चोच पाण्यापर्यंत पोचेना. बिचारा तहानेने कासावीस झाला होता. काय करावे म्हणजे पाणी वर येईल ?
त्याला एक युक्ती सुचली. त्याने एक-एक दगड आणून रांजणात टाकावयास सुरुवात केली. थोड्या वेळात पाणी वर आले. त्याची चोच, आता पाण्यापर्यंत पोहोचू लागली. तो पोटभर पाणी प्याला. त्याची तहान भागली. मग तो उडून गेला.
बोध / तात्पर्य
गरज ही शोधाची जननी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏