सिंह आणि उंदीर
एका रानात एक सिंह रहात होता आणि त्याच्या गुहेत एक उंदीर राहत होता. सिंह एकदा झोपला असता, उंदीर उगीच त्याच्या अंगावरून इकडून तिकडे पळत होता. सिंहाने वैतागून संधी मिळताच त्याला पंजाने पकडले. त्याबरोबर तो गयावया करू लागला व म्हणाला, "तू मला मारू नकोस, मी तुझ्या उपयोगी पडेन." सिंह म्हणाला, "तू कसला माझ्या उपयोगी पडणार. जा आता सोडून देतो, पुन्हा मला त्रास दिलास तर याद राख!" काही दिवसांनी सिंह चुकून शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकला. काही केले तरी त्यास बाहेर येता येईना. इतक्यात तो उंदीर तेथे आला. तो सिंहाला म्हणाला, "तू आवाज न करता पडून रहा. मी जाळे कुरतडतो. उंदराने जाळे कुरतडून सिंह हळूच बाहेर येऊ शकेल, असे मोठे भोक जाळ्यास पाडले. सिंह हळूच बाहेर आला व त्याने उंदराचे आभार मानले, अशा रितीने उंदराने आपले म्हणणे खरे केले.
बोध :- लहान सुद्धा मोठ्यास मदत करू शकतात.
प्रत्येक मनुष्याकडे , प्राण्यांकडे,काहीतरी विशेष गुण असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏