माकडाचे काळीज आणि सुसर
एका सरोवरात एक सुसर राहत होती. सरोवराच्या काठावर एक झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. सुसरीला पोहताना पाहून, माकडाला सरोवरात फिरावे असे वाटे. सुसरीला माकडे छान छान फळे खाताना पाहून फळे खावीशी वाटे. हळूहळू त्या दोघांची मैत्री झाली. माकड सुसरीला म्हणाले,
"सुसरताई मला सरोवरात फिरवून आणशील का ?.. सुसर म्हणाली, "हो! बस माझ्या पाठीवर." टुणकन उडी मारून माकड सुसरीच्या पाठीवर बसले. सुसर माकडास घेऊन फिरावयास निघाली. सुसरीच्या मनात विचार आला, हे माकड रोज गोड-गोड फळे खाते, तर ह्याचे काळीज किती गोड असेल! सुसरीने माकडास विचारले, "तू मला तुझे काळीज देशील का ?" माकड सावध झाले आणि म्हणाले,
"मला आधी का नाही विचारलेस, मी तर काळीज झाडावरच ठेऊन आलो. चल, मला किनाऱ्यावर सोड म्हणजे तुला काळीज काढून देतो." सुसर त्याला घेऊन किनाऱ्यापाशी आली. माकडाने टुणकन उडी मारली आणि झाडावर चढून बसले. • सुसर बिचारी काळीज मिळण्याची वाट पहात राहिली.
बोध /शिकवण/तात्पर्य
मैत्री करताना दक्ष असावे.
मैत्री करताना सावध रहावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏