ससा आणि कासवाची शर्यत
ससा आणि कासव असे दोघे मित्र होते. सशाला वेगाने पळायला आवडे. कासव बिचारे सावकाश चाले. एकदा दोघांनी दूरच्या डोंगरावरील आधी कोण शिवतो? अशी पैज लावली. दोघेही निघाले. ससा पळत पुढे निघाला. कासव मात्र सावकाश चालत राहिले थोडे अंतर गेल्यानंतर वाटेत एक हिरवेगार शेत लागले. त्यात गाजरे लावली होती. सशाने मागे वळून पाहिले, तर कासव खूप दूर होते. त्याने विचार केला, आपण तोपर्यंत गाजरे खाऊ फार तर कासव शेतापर्यंत येईल. मग आपण पुन्हा पळत पुढे जाऊ. सशाने गाजरे खावयास सुरुवात केली. अगदी पोटभर गाजरे खाल्ली. कासव अजूनही दूरच होते.
सशास आता झोप येऊ लागली त्याने विचार केला. आपण थोडी झोप घेऊ तोपर्यंत फार तर कासव शेताच्या थोडे पुढे जाईल पण आपण ताजे तवाने होऊन जोरात पळू व शर्यत जिंकू. सशाने छान पैकी ताणून दिली. ससा झोपला. इकडे कासवाने ससा झोपला असल्याचे पाहिले पण ते थांबले नाही तसेच चालत राहिले. थोड्या वेळाने सशास जाग आली पहातो तर काय ? कासव झाडाच्या अगदी जवळ होते. सशाने खूप जोरात धाव घेतली; पण तोपर्यंत कासव झाडापाशी पोचले देखील, अशा रितीने कासवाने शर्यत जिंकली.
तात्पर्य /बोध/शिकवण
सावकाश आणि सतत काम केल्याने यश मिळते.
*
Nice
उत्तर द्याहटवा