लावी पक्षीण आणि तिची पिल्ले
एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता. त्याचे खूप मोठे शेत होते. ज्वारीची कणसे त्याच्या शेतात डोलत होती. लावी पक्षिणीने त्या शेतात आपले घरटे बांधले. तिच्या घरट्यात २ पिल्ले होती. पक्षीण सकाळीच उठून पिलांसाठी चारा आणी दिवसभर बाहेर राहून संध्याकाळी घरट्यात परत येई. पिल्ले दिवसभरात काय झाले ते तिला सांगत.
एका संध्याकाळी पिलांनी तिला सांगितले की, "शेतकरी म्हणत होता शेतकऱ्यांना कापणीला बोलावतो. आई आपण उद्याच दूर जाऊ, नाही तर त्यांच्या तावडीत सापडू ." आई म्हणाली, नको! दुसऱ्या दिवशी शेतकरी म्हणाला, "गावकरी येत नाहीत, मी सगळ्या नातेवाईकांना बोलावतो." तरी कोणी आले नाही. मग म्हणाला, "माझे शेजारी नक्की येतील. पिल्ले आईला निघण्याची घाई करू लागली. पण पक्षीण काही मनावर घेईना.
शेतकऱ्याने नंतर घरच्यांना घेऊन येतो म्हटले, पिल्ले घाबरली, पक्षीण म्हणाली, "अजून निघण्याची वेळ झाली नाही." पिल्ले म्हणाली, "आई, तो म्हणत होता आता कोणी येवो न येवो मीच कापणीला सुरुवात करतो पक्षीण पिल्लांना म्हणाली, "आता खरी निघण्याची वेळ झाली आहे. आपण आताच निघू." असे म्हणून पिल्लांना घेऊन ती दूर उडून गेली.
बोध /तात्पर्य
जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग संपला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏