मूलभूत हक्क आणि कर्तव्य
भारतीय संविधानाच्या तिसऱ्या विभागात कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांची तरतूद आहे. सुरुवातीस भारतीय नागरिकांना सात प्रकारचे मूलभूत हक्क होते. 44 व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा हक्क यातून वगळून त्याला फक्त कायदेशीर हक्काचे स्वरूप दिले. राज्यघटनेने दिलेले हे अधिकार नागरिकाला उपभोक्ता येतात परंतु आणीबाणीच्या काळात कलम 20 व 21 खालील हक्क वगळता इतर हक्क स्थगित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला आहे.
सहा प्रकारचे मूलभूत हक्क
1)समानतेचा समतेचा हक्क
या हक्काद्वारे भारतीय नागरिकांना कायद्यापुढे समानता व संरक्षण, कोणत्याही कारणास्तव भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा समान संधी ,अस्पृश्यता बंदी व विशेष पदव्यांचे संपुष्टीकरण करून सर्व नागरिकांना समान लेखण्यात आले आहे
2)स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22
भारतीय नागरिकांना सहा स्वातंत्र्य एकोणिसाव्या कलमाने दिलेली आहेत
.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य .
.शांततेने व विनाश शस्त्र जमण्याचे.
. संघटना स्थापनेचे भारतात.
. मुक्तपणे संचार करण्याची.
. कोठेही वास्तव्य करण्याचे .
कोणताही व्यापार व्यवसाय आजीवका करण्याचे.
कलम 20 ते 22 नुसार कायद्याचा भंग झाल्याखेरीज शिक्षा न करण्याचा व एकाच अपराधासाठी अधिक वेळा शिक्षा न करण्याचा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यरक्षणाचा व ठराविक प्रकरणी अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षणाचा हक्क आहे.
21 अ
नुसार सहा ते 14 वयोगटातील मालकांना मोफत शिक्षण.
3. पिळवणुकी विरुद्ध हक्क कलम 23 व 24 वेठबिकार व मानवी अपव्यापारास मनाई असून 14 वर्षाखालील मुलांना कारखाने खाणे व धोक्याच्या ठिकाणी कामास ठेवण्यास बंदी आहे.
4. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28
प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्यानुसार आचरण करण्याचा व धर्माचा प्रसार करण्याचा हक्क दिला आहे मात्र सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था टिकविण्याच्या दृष्टीने सरकार या अधिकाराचे नियंत्रण करू शकते.
5. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम 29 व 30 अल्पसंख्यांकांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी,त्यांना स्वतःची भाषा लिपी व संस्कृती जोपासण्याचा व शैक्षणिक संस्था स्थापन करून त्या चालवण्याचा हक्क दिला आहे.
6. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार कलम 32 मूलभूत अधिकारांवर आक्रमण झाल्यास व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते असे अतिक्रमण दूर करण्यासाठी योग्य तो आदेश काढण्याचा अधिकार न्यायालयास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या अधिकारास राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय संबोधले आहे.
मूलभूत कर्तव्य
घटनेत 11 प्रकारची मूलभूत कर्तव्य आहेत.
1. राज्यघटना राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर.
2. भारताचे सार्वभौमत्व ऐक्य आणि अखंडता यांचे संरक्षण करावे.
3. देशाचे संरक्षण करावे तसेच गरजेच्या वेळी देशाची सेवा करावी.
4.स्वातंत्र्यप्राप्तीसाठी समोर ठेवलेल्या आदर्शांचे पालन करावे.
5.धर्म भाषा आणि प्रांत यासारख्या भेदभावांना दूर करून देशातील नागरिकांमध्ये एकता व बंधुभाव वाढीस लावण्याचे प्रयत्न करावेत.
6. विशेषतः महिलांप्रती असलेल्या वाईट प्रथांचा त्याग करावा. आपल्या गौरवशाली संस्कृतीचा अभिमान बाळगावा तसेच त्या संस्कृतीचे रक्षण करावे.
7. प्राणी मात्रांचे रक्षण करावे तसेच वनसंपदा नदी सरोवरे व सर्वत्र नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करावे 8.मानवता वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भावनेचा विकास करावा.
9.हिंसेचे समर्थन करू नये सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे.
10. सामूहिक आणि व्यक्तिगत कार्यात सतत विकासाचा दृष्टिकोन ठेवावा.
11. सहा ते चौदा वयो गटातील पाल्यास पालकांनी शिक्षण देणे.
खूप छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा