@@@@@@
चुका विसरा .... पण त्याची कारणे लक्षात ठेवा
ज्याच्या हातून चुका होत नाहीत तो माणूसच नाही, असे आपण मानतो.
म्हणून
तर आपल्या हातून झालेल्या चुका आपण विसरतो पण आपल्या हातून या चुका का झाल्या याची कारणे जर आपण प्रत्येक वेळी शोधून लक्षात घेतली तर मात्र भविष्यकाळात आपल्या हातून कमीत कमी चुका होतील
अज्ञान, विस्मरण, दुर्लक्ष, शारीरिक अस्वास्थ इत्यादीमुळे आपल्या हातून काही चुका होत असतात काहीजण या चुकांची कारणे शोधून अशा चुका आपल्या हातून पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रयत्न करतात आणि त्यात ती यशस्वी होतात आणि जी माणसे चुकांची कारणे शोधीत नाहीत ती पुन्हा चुकतात आणि दुःखी होतात.
काही राष्ट्रे पहिल्या महायुद्धाची कारणे विसरली म्हणून तर दुसरे महायुद्ध झाले.
गर्दीत दागिन्यांच्या चोऱ्या होणे, काही विद्यार्थी नापास होतात याला हेच कारण महत्त्वाचे आहे. झालेल्या चुका पुन्हा दुरुस्त होऊ शकत नाहीत कारण भूतकाळातल्या घटना आहेत. पण भूतकाळावर भविष्यकाळ, वर्तमानकाळ अवलंबून असतो म्हणून झालेल्या चुकांची कारणे लक्षात घेतल्यास लक्षणीय सुधारणा होते. म्हणूनच म्हणतात की, 'चुका विसरा पण त्याची कारणे लक्षात ठेवा.'
🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏