अश्रूंची रूपे
अश्रू म्हणजे डोळ्यांतून येणारे पाणी हे पाणी काही वेळेला शरीर आणि मनाला दुःख झाल्यामुळे येते किंवा काही वेळेला अपेक्षेपेक्षा जास्त आनंद झाला तरीही येते. यावरूनच डोळ्यांतून येणाऱ्या या पाण्याला दुःखाश्रू किंवा आनंदाश्रू म्हणतात. ज्या वेळी सहन न करता येण्यासारख्या शारीरिक वेदना होतात, मग त्या
आंतरिक असोत की बाह्य भागावरच्या असोत. अशा वेळी माणसाची सहनशक्ती संपते. मग त्याला होणाऱ्या दु:खामुळे त्याच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागते. यालाच आपण दु:खाश्रू म्हणतो. शरीरावर होणारी मोठी जखम, भाजणे, शरीराचा एखादा अवयव आपटला जाणे, मुरगळणे किंवा डोके पोट दुखणे या वेदना जर काहीशा जास्त असतील तर त्या होणान्या त्रासाने डोळ्यांतून येणारे पाणी हे दुःखाश्रू होत. तसेच मनाविरुद्ध काही घडतात, भयंकर अपमान होतो, फार मोठा अपेक्षाभंग होतो. अशा वेळी सहनशक्ती संपून डोळ्यांतून पाणी येते. हेही दुःखाश्रूच असतात.
याउलट एखाद्या वेळी अपेक्षेपेक्षा फार मोठे यश मिळते, अत्यंत आवडती व्यक्ती खूप दिवसांनी भेटते. अशासारख्या कमालीच्या आनंद देणान्या घटना जर घडल्या तर त्यामुळे होणारा आनंद आपण सहन करू शकत नाही. अशा वेळी ही आपली सहनशक्ती संपते आणि आपल्या डोळ्यांतून पाणी येऊ लागते. याला आपण आनंदाश्रू म्हणतो.
साधारणतः लहान मुलांची सहनशक्ती कमी असल्यामुळे त्यांना शारीरिक अथवा मानसिक जो त्रास होतो त्या त्रासामुळे ती मुले रडायला लागतात. परंतु अशा छोट्या दु:खामुळे मोठी माणसे अश्रू ढाळीत नाहीत. याचे कारण त्यांची सहनशक्ती मुलांपेक्षा वाढलेली असते. याउलट आनंदाश्रूंचे प्रमाण लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांत जास्त आढळते. काही वेळेला असेही आढळते की, एकाच परिस्थितीत दोन भिन्न स्वभावाची माणसे सापडली तर त्यातील एक व्यक्ती रडत बसते व एक शांतपणे बसून राहते. हा त्यांच्यातील सहनशक्तीच्या फरकाचा परिणाम आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त हळव्या मनाच्या असतात.
काही लबाड माणसे या दुःखाश्रूंचा गैरवापर करून दुसन्या व्यक्तींची सहानुभूती मिळतवतात व आपला स्वार्थ साधतात, अशी माणसे ढोंगी असतात. अशा वेळी त्यांच्या डोळ्यांतून येणाऱ्या पाण्यांना नका म्हणतात.
आनंदाश्रू काय किंवा दुःखाश्रू काय ही दोन्हीही अश्रूंचीच रूपे आहेत. काही आळेला माणसांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटण्यासाठीही अश्रूंचा उपयोग होतो. परंतु काही माणसे मात्र खूपच सहनशील असतात. ती माणसे आपले अश्रू सहसा येऊ देत नाहीत. येईल त्या परिस्थितीला ते खंबीरपणे तोंड देतात, पण डोळ्यांतून पाणी काढीत नाहीत अशी आहेत ही अश्रूंची दोन रूपे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏