!!! *घटस्फोट घेऊ नका* !!!
आय पी एस अधिकारी महिलेने लिहिलेली छान कविता ..,..
* नवरा बिचारा काय म्हणतो
किमान ऐकून घ्या
पटलं तर हो म्हणा
नसता सोडून द्या *
* साध्या क्षुल्लक कारणा वरून
वाद घालू नका
घरातल्या मोठ्या माणसांना
चर चर बोलू नका
काय उपयोग आहे तुझ्या
उच्च शिक्षित असण्याचा
मुळीच गर्व करू नकोस
थोडं बरं दिसण्याचा *
* नौकरी करतेस , हातभार लावतेस
चांगली गोष्ट आहे
फड फड तुझं बोलणं
कुठं बेस्ट आहे ? *
* आईशी सलगी करतांना
सासुशी नको भांडू
आयुष्यातले सुखाचे क्षण
उगीच नको सांडू *
* स्वछता , टापटीप
घर पॉश असावं
याचा अर्थ असा नाही की
घरात कुणीच नसावं *
* थकलेले आई वडील
सांग कुठे जातील ?
आज ना उद्या आई बाबा
मुला कडेच येतील *
* खरं सांग या मुद्द्यावर
भांडण व्हायला पाहिजे का ?
म्हातारपणी त्यांनी काय
आश्रमात जायला पाहिजे का ? *
* अशिक्षित आहेत ,साधे आहेत
मान्य आहे मला
याचा अर्थ असा नाही की
घालून पाडून बोला *
* आई वडिलांचं दिसणं नाही
असणं महत्वाचं असतं
म्हातारी माणसं असतील तर
घर शोभून दिसतं *
आई वडील घरात असणं हा
इंटेरियरचाच भाग आहे
समजू नकोस सुरकूतला चेहरा
पॉश हॉलला दाग आहे *
* खर्च होतो खर्च होतो
होऊ दे आशीर्वाद मिळेल
तू म्हातारी झाल्यावर तूला
सारं काही कळेल *
* शिकली सवरली मुलगी तू
यावरून घटस्फोट व्हावेत ?
लाखोंचं पॅकेज असलं तरी
मार्क शून्य द्यावेत *
* तुझ्या आई वडिलांचा
मी आदर करतो
पाहतीस तू चालतांना
त्यांचाही हात धरतो *
* थकलेल्या देहां सोबत
आपलं तुपलं करू नको
माणसांना दूर फेकून
वस्तूंनी घर भरू नको *
* म्हाताऱ्याना काही नको
फक्त गोड बोला
म्हण न तू सासूबाई
वालाच्या शेंगा सोला *
* मुलींनो समजून घ्या
नवरा काय म्हणतो
माया ,प्रेम ,आपुलकीनेच फ्लॅट स्वर्ग बनतो ! *
पोस्ट आवडली असेल तर जरुर शेअर करा. 🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏