अविचार आणि आत्मघात
कोणतीही कृती करताना जर त्यासंबंधी काहीसा विचार न करता घाईने ती कृती केली तर त्यात आपले फार नुकसान होत असते. कोणतेही काम करताना ते काम चांगले, लवकर कमी त्रासात आणि कमी खर्चात कसे होईल, त्या कामात कोणते अडथळे येऊ शकतील, त्यावर कोणते उपाय योजता येतील, या कामासाठी साधनसामग्री कोणती लागेल व ती कशी मिळवता येईल इत्यादीबाबत अगोदर विचार करून ते काम करायला लागल्यास ते काम मनाजोगे होते. अशा वेळी आपल्याही मनाला त्या कामाच्या यशामुळे पूर्णत्वामुळे समाधान लाभते, आनंद होतो. परंतु याउलट घडल्यास आणि परिणामाची जाणीव न ठेवता आपण एखादा घाईने निर्णय घेतल्यास काही वेळेला आपल्यावर पश्चात्तापाची पाळी येते. अपमानित व्हावे लागते, दुःख भोगावे लागते.
अशा अविचारामुळेच रस्त्यावर अपघात घडतात, भांडणे होतात, काही अप्रिय घटना घडतात. याचा अर्थ एखादी कृती करण्यापूर्वी विचारांचा खूप काथ्याकूट करावा असा मात्र नव्हे. पण साधक-बाधक परिणामाची जाणीव न ठेवता वागले तर फार नुकसान होते. म्हणून म्हणतात की, 'अविचाराने आत्मघात होतो.
अविचाराने कोणतेही काम करू नये 🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏