केल्याने होत आहे रे
संत रामदासांनी कृतीशीलतेचे महत्त्व वरील श्लोकाद्वारे सांगितले आहे. कोणतीही गोष्ट ठरविल्याशिवाय, निश्चित केल्याशिवाय होऊ शकत नाही. "केल्याने होत आहे रे, आघि केलेची पाहिजे" म्हणजे तुम्ही नुसते विचार करीत बसू नका, कार्यप्रवण व्हा; प्रारंभ करा म्हणजे कार्य सिद्धीस जाईल, तडीस जाईल..
परंतु काहीही कृती न करता नुसते झाले पाहिजे असे म्हणत राहिलात तर ती दिवास्वप्ने ठरतील तुमच्या मनातील कार्यप्रवणतेचे रसायन सतत उकळत पहिले पाहिजे, तुम्हाला मोठे व्हायचे आहे. यशस्वी व्हायचे आहे हा विचार मनात येणे व त्यासाठी प्रयत्नांची सुरुवात करणे, सतत पाठपुरावा करणे, सराव करणे, पहिल्या चुका टाळणे, पुन्हा त्या होणार नाहीत असा कटाक्ष ठेवणे याने यशाकडे तुमची वाटचाल सुरू होईल. या प्रयत्नातून तुमचा मार्ग तुम्हाला सापडेल. यश दृष्टिपथात आले, मिळायला लागले, मिळाले की अपार आनंद होईल परंतु याचे बीज असे असे घडावे हा विचार तुमच्या मनात येण्याने व तसे घडावे म्हणून प्रयत्न करण्यानेच होईल
यशस्वी होण्यासाठी, सिद्धीसाठी प्रार्थना हवी पण ती प्रार्थना यशस्वी होण्यासाठी तिला प्रयत्नांची जोड हवी. प्रसिद्ध कलावंत, गायक, नट, चित्रकार, वादक, क्रीडापटू है एकाएकी मोठे झालेले नसतात, त्यामागे असते त्यांनी केलेली अपार साधना, केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट !!
सुंदर वस्तू, चांगली गोष्ट एका दिवसात तयार होत नाही. ताजमहाल या अद्वितीय इमारतीचे बांधकाम २२ वर्षे सुरू होते, वेरूळचे कैलास लेणे अनेक वर्षे खोदले जात होते. या सर्वांमागे असते ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेरणा !! निर्मिती मागील प्रेरणा, ऊर्मी, निर्मिती करण्याची इच्छा हा ऊर्जास्रोत महत्त्वाचा आहे. कुठलीही महत्त्वाकाक्षा उराशी बाळगून तिच्या पूर्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे यशाला गवसणी घालण्यासारखे आहे. नंत रामदासांनी "केल्याने होत आहेरे, आधि केलेची पाहिजे" या दिलेल्या बीजमंत्राचे अनुसरण करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏